सीमेपार लढलेल्या मराठयांच्या असीम धैर्याचा,शौर्याचा आणि कर्तृत्वाच्या रणसंग्रामाची गाथा ‘बलोच’ या मराठी चित्रपटात दाखवण्यात आली आहे.आता हा चित्रपट राज्यातील सर्व शाळेमध्ये दाखवण्यात येणार आहे.प्रकाश जनार्दन पवार, विश्वगुंज पिक्चर्स, पुणे यांनी बलोच हा मराठी चित्रपट राज्यातील शाळांमध्ये दाखविण्यात यावी अशी विनंती शासनाकडे केली होती.
त्यानंतर आज शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे.इतिहासात सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. बलोच चित्रपटाबाबत काही अटी घालत २०२३-२४ या एक वर्षापूर्ती राज्यातील शाळेंमध्ये दाखवण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
हमास दहशतवाद्यांच्याच्या नौदल कमांडरला इस्त्रायल सैन्याने घेतले ताब्यात
तेलंगणामध्ये मृतावस्थेत आढळली १०० माकडे!
जर श्री रामजन्मभूमी परत घेता आली तर आम्ही ‘सिंधूही’ परत आणू!
दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच
अटी काय आहेत?
बलोच हा चित्रपट राज्यातील शाळांमधील फक्त १० वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार आहे.सदर चित्रपट पाहण्याची कोणत्याही विद्यार्थ्यांना सक्ती करू नये.तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता शाळेने घ्यावी.चित्रपट पाहण्यास इच्छुक विद्यार्थ्यांकडून रुपये २० पेक्षा जास्त शुल्क आकारू नये.हा चित्रपट शाळांमधून दाखविताना कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण झाल्यास किंवा तक्रार झाल्यास संस्थेस देण्यात आलेली परवानगी तात्काळ रद्द करण्यात येणार आहे.चित्रपट दाखवण्याची परवानगी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या एक वर्षापूर्ती मर्यादित असणार आहे.