महाराष्ट्र शासनाकडून नेहमी विविध पुरस्कार जाहीर केले जात असतात ज्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती सन २०२०’ च्या पुरस्कारामध्ये सुप्रसिद्ध बालसाहित्यकार, मुंबई महानगर पालिकेच्या शाळेतील शिक्षक आणि जे के मीडियाचे लेखक एकनाथ आव्हाड यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि दिलीपराज प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ‘शब्दांची नवलाई’ या बालकवितासंग्रहास महाराष्ट्र शासनाच्या बालकवी पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. ५० हजार रुपये, सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
आजपर्यंत या पुस्तकाला अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार, ए. पी. रेंदाळकर वाचनालय, कोल्हापूर यांचा उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्य विहार संस्था, नागपूरचा उत्कृष्ट कुमार साहित्य राज्यस्तरीय पुरस्कार, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच, चंद्रपूर संस्थेच्या वतीने दिला जाणारा विमलबाई देशमुख स्मृती सूर्यांश राज्यस्तरीय पुरस्कार आणि साहित्यकणा फाउंडेशन, नाशिक यांच्याकडून डॉ. राहुल पाटील स्मृती उत्कृष्ट बालसाहित्य राज्यस्तरीय पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
हे ही वाचा:
आज पडणार IPL चा हातोडा! कोण होणार मालामाल? कोणाला मिळणार ठेंगा?
मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याचा घोटाळा?
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचा नवाब मालिकांना दणका
डॉक्टर घेणार हिप्पोक्रॅटिक ओथ ऐवजी चरक शपथ?
गेल्या वर्षी एकनाथ आव्हाड यांनी न्यूज डंकाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या शब्दांची नवलाई या पुस्तकाबद्दल चर्चा केली होती आणि त्याचसोबत काळानुरूप बालकवितांची रचना बदलणे गरजेचे का आहे या विषयी त्यांनी आपली मते मांडली होती. म्हणी, वाकप्रचार, समानार्थी- विरुद्धार्थी शब्द, जोडशब्द, अलंकार, व्याकरण हे सारेच शब्दांची नवलाईमधील कवितांमधून सहजगत्या उलगडले आहे. एकंदरीतच मराठी भाषेची गोडी आणि आपुलकी वाढवणाऱ्या बालकविता या पुस्तकात आहेत.