बालभारतीच्या ५ हजार ६३३ टन पुस्तकांना आला रद्दीभाव

बालभारतीच्या ५ हजार ६३३ टन पुस्तकांना आला रद्दीभाव

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ म्हणजेच ‘बालभारती’ने आपल्याकडील शेकडो टन पुस्तकं रद्दीत काढली आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये तब्बल पाच हजार ६३३ टन पुस्तके बालभारतीकडून रद्दीत काढण्यात आलेली आहेत. ही पुस्तकं जुन्या अभ्यासक्रमाची असल्याचं सांगत बालभारतीकडून पुस्तके थेट रद्दीमध्ये काढण्यात आलेली आहे. एकीकडे राज्यातील खेडोपाडी विद्यार्थी आजही पुस्तकांशिवाय अभ्यास करत आहेत. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या पुस्तकांची किंमत सहाकोटी ४० लाख २ हजार ६१ रुपये इतकी आहे. माहितीच्या अधिकारातून ही पुस्तके रद्दीत विकल्याचे उघड झालेले आहे.

२०१२ पासून ते अगदी आत्तापर्यंतची सर्व माहिती सध्याच्या घडीला उपलब्ध झालेली आहे. सहा कोटी ४० लाखांची पुस्तके थेट रद्दीत विकण्यात आलेली आहेत. रद्दीत विकण्यासाठी पुस्तके काढली जातात का याप्रश्नावर मात्र काहीच उत्तर नाही. त्यामुळेच आता संबंधित घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमासोबत इतर अवांतर असलेली तब्बल पाच हजार ६३३ टन पुस्तके बालभारतीने रद्दीत काढली आहेत.

ही पुस्तकं मंडळाच्या पुणे, गोरेगाव, लातूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि पनवेल याठिकाणी असलेल्या गोदामांमध्ये पडून आहेत. कागदी लगदा करण्यासाठी या पुस्तकांची विक्री केली जाणार असल्याचं बालभारतीनं थातूर मातूर कारण दिलेले होते. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं गोदामात पडून राहिलीच कशी, असा सवाल आता सर्वच स्तरातून उपस्थित होत आहे.

 

हे ही वाचा:

केरळमध्ये पावसाचे तांडव! भुस्खलनामुळे जीवित हानी

पंचाने केली नवाब मलिक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

धक्कादायक! … म्हणून तब्बल २७०० कोरोना प्रतिबंधक लसी झाल्या खराब!

राज ठाकरेंच्या नावे खंडणी मागणारे पोलिसांच्या ताब्यात!

 

इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम दोन वर्षांपूर्वी बदलण्यात आला. त्यानंतर नव्या अभ्यासक्रमानुसार पुस्तके छापण्यात आली. शिवाय गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना गेल्यावर्षी आणि यावर्षीही पुस्तकं मिळू शकलेली नाहीत. अभ्यासक्रम बदललेला असल्यानं एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं वापरात आलेली नाहीत. त्यामुळे पुस्तकांच्या छपाईसाठी आलेल्या कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया गेला आहे असंच म्हटलं जात आहे.

Exit mobile version