‘काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

‘काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला’

महायुतीला बहुमत मिळालेले असताना खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, पक्ष विकालयाल काढला तेव्हा आम्ही उठाव केला आणि काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. कितीही संकटे आली तरी जनतेच्या भावनांशी खेळणार नाही, असे ते म्हणाले. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील उमेदवार महेश शिंदे आणि पाटणमधील उमेदवार शंभूराज देसाई यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (५ नोव्हेंबर) प्रचार सभा घेतल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काँग्रेसबरोबर केलेला घरोबा बाळसाहेबांनाही मान्य नव्हता, म्हणून आम्ही उठाव केला आणि धनुष्यबाण वाचवला आणि शिवसेना वाढवली. आज राज्यभरातून कार्यकर्ते शिवसेनेत सहभागी होत आहे. लोकसभेत उबाठाच्या समोर १३ जागा लढलो त्यातील ७ जागा आपण जिंकलो. त्यामुळे शिवसेना कोणाची हे जनतेने सिद्ध केले.

ते पुढे म्हणाले, पाटणमध्ये तिरंगी लढत नाही तर एकच रंग दिसतोय तो म्हणजे भगवा रंग. कोणीही येवो पाटणचा गड शंभूराज देसाईच सर करणार. आम्ही जेव्हा उठाव केला तेव्हा शंभूराज देसाई माझ्या दोन पावलं पुढे होते. त्यामुळेच त्यांना दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद दिले, असे मुख्यमंत्री शिंदेनी सांगितले.

हे ही वाचा : 

बांदीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार!

महाराष्ट्रातील महिलांनी जागे होण्याची वेळ!

‘हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दल मुंबईतील कॅनडाच्या दूतावासासमोर करणार आंदोलन’

‘औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले’

कोरेगावमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीने मेट्रो बंद पाडली, अटल सेतूचे काम रोखले, कोस्टल रोडचे काम बंद केले. आम्ही सर्व प्रकल्प सुरु केले आणि पूर्ण केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महेश शिंदे हा चौकार षटकार मारुन सेंच्युरी मारणारा भरवशाचा बॅट्समन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. कोविड काळात परवानगीशिवाय स्वत:च्या जीवावर कोविड सेंटर सुरु करणारा महेश शिंदे एकमेव आमदार आहे. महेश शिंदे यांना कार्यसम्राट नाही तर जलनायक आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले.

Exit mobile version