गोवा मुक्ती दिनावर बाळासाहेबांनी काढलेले हे भन्नाट व्यंगचित्र

गोवा मुक्ती दिनावर बाळासाहेबांनी काढलेले हे भन्नाट व्यंगचित्र

आज गोवा राज्याच्या स्वातंत्र्याला ६० वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने गोव्यात निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. स्वतः पंतप्रधान मोदी हे या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. त्यासाठी ते गोव्यातही दाखल झाले आहेत. आज पंतप्रधान मोदींनी आणि इतर अनेक नेत्यांनी पोर्तुगीज सैनिकांशी लढा देऊन त्यांना हाकलवून लावणाऱ्या वीरांविषयी आदर व्यक्त केला आहे.

गोवा स्वतंत्र झाल्या नंतर या स्वातंत्र्याचा उत्सव आणि आनंद भारतभर साजरा करण्यात आला होता. यावेळी वर्तमानपत्रातून यावर भरभरून लेख लिहून आले होते. तर व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्याच्या फटकाऱ्यांमधून गोव्याचा विजय साजरा केला होता. त्यातलेच एक होते जागतिक दर्जाचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

हे ही वाचा:

केरळमध्ये पुन्हा फोफावला राजकीय हिंसाचार! १२ तासात २ हत्या

महाविकास आघाडीचं सरकार दारू विकणाऱ्यांचं, दारू पिणाऱ्यांचं!

गोवा मुक्ती संग्रामात वीरमरण आलेल्या संघ स्वयंसेवकांची गोष्ट

शिवभोजन योजना बंद होणार? ५ महिने अनुदानच नाही

बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या कुंचल्याची जादू दाखवत पोर्तुगीजांच्या जखमेवर मीठ चोळले होते. त्यांच्या ठाकरी शैलीत त्यांनी पोर्तुगीजांना चपराक लगावली होती. त्यांच्या ‘फटकारे’ या पुस्तकात हे त्यांचे व्यंगचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Exit mobile version