बाळासाहेब का म्हणाले, मराठी माणूस मुख्यमंत्री होईल बाकी कुणी नाही?

राज ठाकरे यांनी भाषणात रंगविले बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व

बाळासाहेब का म्हणाले, मराठी माणूस मुख्यमंत्री होईल बाकी कुणी नाही?

विधिमंडळात सोमवारी शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी अनेकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी आपली मते व्यक्त केली. राज ठाकरे यांचे भाषण विशेषकरून गाजले.

विधिमंडळातील या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार व केंद्रीय मंत्री नारायण राणे, मनसेप्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा स्मिता ठाकरे यांची मुलेही कार्यक्रमाला उपस्थित होती.

राज ठाकरे म्हणाले की, राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन हे तैलचित्र लावल्याबद्दल. येथे उपस्थित असलेले आणि उपस्थित नसलेले अनेकजण. ज्या व्यक्तीमुळे ही इमारत बघायला मिळाली त्या बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होतंय याचा आनंद आहे. मला बाळासाहेबांचा मिळालेला सहवास व्यगंचित्रकार, राजकीय नेता, पत्रकार असा विविधांगी आहे. सुरुवात कुठून करायची समजत नाही. ते स्वतः गाडी चालवत ते शाळेतून न्यायला यायचे. एका घरातील व्यक्ती एक शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार अशी विविध अंगे एका माणसात मी पाहात होतो. वारसा हा वास्तूचा नसतो विचारांचा असतो. माझ्याकडे काही आले असेल जपलं असेल तर विचारांचा वारसा जपलाय.

हा माणूस कसा होता? कुठच्या गोष्टीत मुलायम होता, कडवट होता हे मी पाहात आलो. संस्कार होत असताना ते वेचायचे असतात. मी वेचत गेलो. मी कडवट मराठी आहे. माझा जन्म कडवट मराठी घरात झाला आहे. हिंदुत्ववादी घरात झाला आहे. कडवट मराठीपण पाहायला मिळालं ऐकायला मिळालंय हा माणूस बाहेर वेगळा आत वेगळा कधीच नव्हता.

उत्तम उदाहरण सांगतो की, १९९९सालची. नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हाची विधानसभेची निवडणूक झाली. मुंडे होते. काही कारणास्तव शिवसेना भाजपा युती मुख्यमंत्रीपदावर अडत होती. काही घडत नव्हते. १५-२० दिवस आमदार खेचणे सुरू होते. एकदिवशी दुपारी मातोश्रीत बसलो होतो. गाड्यांचे आवाज आले. दोन गाड्या लागल्या. त्यातून पुण्याचे जावडेकर आणि दोनचार जण भाजपा, शिवसेनेचे नेते आले. मला म्हणाले की, राजसाहेब बाळासाहेबांना भेटायचे आहे. मी म्हटलं. झोपलेत. उठल्यावर सांगतो. ते म्हणाले, अर्जंट आहे, आज सरकार बसतं आहे. त्यामुळे अर्जंट भेटणं गरजेचं आहे. निरोप द्याल का आम्ही थांबतो. दोघांचं ठरलं आहे सुरेशदादा जैन युतीचे मुख्यमंत्री असतील आणि ते आमदार आणतील आणि सरकार बसतंय. हे बाळासाहेबांच्या कानावर घालायचं.

मी वरती गेलो. काळोख होता. शांतता होती. मी त्यांना आरे तुरे करत होतो. म्हणालो की, ए काका उठ. म्हटले. वळले म्हणाले कायरे. जावडेकर वगैरे आलेत. सरकार बसेल असं म्हणाले. सुरेशदादांना मुख्यमंत्री करायचं मग सरकार बसेल. तेव्हा बाळासाहेब मला म्हणाले की, मराठी मुख्यमंत्रीच बसेल बाकी कुणी नाही आणि झोपले. या माणसाने मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली. मराठीची गोष्ट असते तिथे कडवटपणा, हिंदुत्वासाठी कडवटपणा. राज ठाकरे यांनी दुसरा प्रसंगही सांगितला.

हे ही वाचा:

राज्यपाल कोश्यारी म्हणतात, मनन-चिंतन करायचे आहे, आता जबाबदारीतून मुक्त करा!

प्रदीप शर्मांचा जामीन न्यायालयाने नाकारला

नेताजी तुम्हाला विसरता येणार नाही !

बाळासाहेबांचे विचार आमच्या माध्यमातून पुढे नेण्याचे काम करत राहू!

दुपारी बाबरी पडली होती. आजच्यासारखे टीव्ही नव्हते. पडली पडली पडली असे वारंवार दाखवत नव्हते. मागे मनसेच्या कार्यकर्त्यांनी समोश्याची गाडी उलटी केली तर कितीतरी वेळा दाखवली. माझे तेवढ्यात समोसे मोजून झाले. तर हा बाबरीचा प्रसंग टीव्हीवर फार काळा दाखवत नव्हते. पण एक फोन आला. टाइम्समधून असेल. त्याने विचारलं की, भाजपाचे भंडारी म्हणताहेत आम्ही हे केलेले नाही. ही शिवसैनिकांनी केलेली असेल. त्यावर बाळासाहेब ताडकन म्हणाले की, जर शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्याचा अभिमान वाटतो. एक जबाबदारी घेणे ही महत्त्वाची गोष्ट होती. बाळासाहेब हे जेवढे कठोर होते, तेवढेच मुलायम होते. तेवढेच साधे.

राज ठाकरेंनी आणखी एक किस्सा सांगितला. आजोबा गेले ७४-७५ची गोष्ट पोर्तुगीज चर्चला त्यांचा पुतळा बसवला होता. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते अनावरण झालं पुतळ्याचं. बाळासाहेबांचा भाषण होतं. ते म्हणाले की, स्वत:च्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावऱण झालं. आज पुतळा बघितला पण याच्याआधी बघितला असता तर चांगलं असतं. मधू दंडवतेंच्या वडिलांसारखा वाटतो.

राज यांनी सांगितले की मी बाळासाहेबांची फोटोबायोग्राफी केली. १७ हजार फोटो पाहिले. ७००-८०० फोटो निवडले. त्यात बाळासाहेबांचा आलेख आलेला आहे. हेच पाहात आलो. माझ्यासाठी मनापासून श्रद्झधांजली.

राज म्हणाले की, नार्वेकर माझी विनंती आहे की, अशी दोन तैलचित्र असावीत एक विधानपरिषदेच्या सभागृहात आणि विधानसभेत असावं. त्यातून अनेकांना कळेल की आपण कुणामुळे आलो.

Exit mobile version