कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पराभव, आता लढणार कांस्यपदकासाठी

कुस्तीपटू बजरंग पुनियाचा पराभव, आता लढणार कांस्यपदकासाठी

भारताने आजच्या दिवसाची सुरुवात महिला हॉकी संघाच्या पराभवाने केल्यानंतर आणखी एक पराभव भारताच्या नशिबी आला आहे. कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात भारताचा आघाडीचा पैलवान बजरंग पुनिया पराभूत झाला आहे. त्यामुळे फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यापासून तो थोडक्यात राहिला. ज्यामुळे त्याच्या हातातून सुवर्णपदक मिळवण्याची संधीही निसटली आहे. अझरबैजानचा हाजी अलीयेब याने पुनियाला १२-५ च्या फरकाने मात दिली. पण बजरंगकडे अजूनही कांस्य पदक पटकावण्याची संधी असून भारताला पदक मिळण्याच्या आशा अजूनही कायम आहेत.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इराणच्या मोर्तेजा घियासीला मात देत सेमीफायनलमध्ये बजरंगने प्रवेश केला होता. पण सेमीफायनलमध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागल्याने त्याची विजयी घोडदौड याच ठिकाणी थांबली आहे.

हे ही वाचा:

‘संसदेचं अधिवेशन चालू द्या’ म्हणत ‘या’ खासदाराचं आंदोलन

हिंदुत्वाबद्दल मनसे नेते नांदगावकर म्हणाले…

आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?

बजरंग आणि हाजी अलीयेव यांच्यातील सेमीफायनलच्या सामन्यात सुरुवातीपासून हाजी याने आपला दबदबा कायम ठेवला होता. सुरुवातीलाच ४ गुण घेतलेल्या हाजीसमोर पुनिया एकच गुण घेऊ शकला. ज्यामुळे तो पहिल्या राउंडमध्ये  ४-१ ने पिछाडीवर पडला. त्यानंतर दुसऱ्या राउंडमध्ये बजरंगने ४ आणखी गुण घेतले. पण तोवर पैलवान हाजी याने तब्बल ८ गुण घेत सामन्यात १२-५ ची विजयी आघाडी घेतली. जी विजयी आघाडी पुनिया अखेपर्यंत भेदू न शकल्याने तो सेमीफायनलमध्ये पोहचू शकला नाही.

Exit mobile version