जुलैमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा झटका बसला आहे. मार्चमध्ये झालेल्या डोपिंग चाचणीत सहभागी न झाल्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे. बजरंग पुनिया याला राष्ट्रीय एंटी-डोपिंग संस्थेने (NADA) निलंबित केले आहे. NADA च्या या निर्णयामुळे बजरंग पुनियाचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. बजरंग पुनियाने डोपिंग चाचणीत येण्यास नकार दिल्यानंतर राष्ट्रीय एंटी-डोपिंग संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय एंटी-डोपिंग संस्थेने २३ एप्रिल रोजी बजरंग पुनियाबाबत निलंबनाचे पत्र लिहिले होते. ज्यामध्ये राष्ट्रीय एंटी-डोपिंग संस्थेने म्हटले आहे की, जोपर्यंत बजरंग पुनियाबाबत अंतरिम निर्णय होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. ६५ किलो वजनी गटात पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणे पुनियाचे स्वप्न होते, जे आता भंग होण्याची शक्यता आहे.
बजरंग पुनिया याला व्यावसायिकदृष्ट्या त्वरित प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. खटल्याची सुनावणी आणि निर्णय होईपर्यंत कोणत्याही स्पर्धेत किंवा उपक्रमात भाग घेऊ शकत नाही, असे निर्देश देण्यात आले आहेत. बजरंगवरील हे आरोप कायम राहिल्यास तो ऑलिम्पिकच्या निवड चाचणीत सहभागी होऊ शकणार नाही. चाचण्या जिंकणारा खेळाडूच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल. पुनिया यांनी नमुने का दिले नाहीत याबाबत ७ मेपर्यंत याबाबतचे लेखी स्पष्टीकरण द्यायचे आहे.
हे ही वाचा:
ब्राझीलमध्ये मुसळधार पावसाचा हाहाःकार; ५७ हून अधिक जणांचा मृत्यू
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू!
गुजरातवरील विजयामुळे बेंगळुरूच्या ‘प्लेऑफ’मध्ये जाण्याच्या आशा जिवंत!
‘रोहित वेमुलाच्या मृत्यूचे राजकारण केल्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी’
बजरंग पुनिया याने यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडीओमध्ये त्याने म्हटले होते की, नाडा अधिकारी त्यांचे नमुने घेण्यासाठी कालबाह्य उपकरणे वापरतात. आपल्याला गोवण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.