बजरंगमुळे ब्रॉंझरंग

बजरंगमुळे ब्रॉंझरंग

भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत २ पॉईंट घेतले. ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकचू कायम ठेवली. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून २ पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी २ पॉईंट घेऊन, आपली आघाडी ६-० अशी केली. अखेर बजरंग पुनियानं मॅच ८-० अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.

भारताचा पैलवान बजरंग पुनिया याची आज कझाकिस्तानच्या पैलवानाशी कांस्यपदकाशी लढत झाली.  कझाकिस्तानच्या डॉलेट नियाझबेकोवशी लढत होती. बजरंग पुनिया या मॅचमध्ये पहिल्यापासून सकारात्मक खेळ करताना दिसून आला. पहिल्या राऊंडमध्ये बजरंग पुनियाला २-० अशी आघाडी मिळाली होती.  प्रतिस्पर्धीखेळाडू  सुरुवातीपासून नकारात्मक खेळ करताना दिसून आला. बजरंग पुनियानं दुसऱ्या राऊंडमध्ये लागोपाठ ६  गुण मिळवतं आघाडी भक्कम केली आणि त्याचं विजयामध्ये रुपातंर केलं आहे.

हे ही वाचा:

तालिबानने एक शहरही काबीज केले

दरडग्रस्तांना मदत करण्यात ठाकरे सरकार अपयशी

एबी डिव्हिलियर्सवर वंशभेदाचा आरोप का झाला?

राऊत यांचा मेजर ध्यानचंद यांच्या नावाला विरोध आहे का?

२५ वर्षीय बजरंग आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. जागतिक क्रमवारीत तो अव्वल स्थानावर आहे. नुकतंच त्याने आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये त्याने ६५ किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे, तर राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने सुवर्ण पटकावलं होतं. केंद्र सरकारने त्याचा अर्जुन पुरस्कार आणि यंदा ‘पद्मश्री’ने गौरव केला आहे.

Exit mobile version