बजाजची इलेक्ट्रिक दुचाकी लवकरच बाजारात?

बजाजची इलेक्ट्रिक दुचाकी लवकरच बाजारात?

बाजाज ऑटोमाईल ही भारतीय बाजारातील अग्रणी वाहन उद्योजक कंपनी आहे. आजवर विविध प्रकारच्या गाड्यांनी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अशातच बजाज आता भारतातील वाढत्या इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात उतरण्याच्या प्रयत्नात असल्याचे कळले आहे.

पेट्रोलच्या वाढत्या किंमती पाहता ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढताना दिसत आहे. अनेक कंपन्या आता भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्या उतरवत आहेत. त्यामुळे भारतीय वाहन उद्योगात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढत आहे. आता दुचाकी वाहन निर्माता कंपनी बजाज ऑटो देखील या क्षेत्रात उतरत आहे. कंपनीने Fluor आणि Fluir या दोन नावांची नोंदणी केली असून, ही नावे बजाजच्या आगामी इलेक्ट्रिक बाइक्सची असू शकतात असे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

आरसीबीच्या सिंहावर मास्क

आयपीएलवरही आता कोरोनाचे संकट

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे ऑक्सिजन बेडचा प्रश्न सुटणार

राष्ट्रीय लॉकडाऊन अटळ?

देशात कोरोना रुग्णसंख्येत घट

कंपनीच्या नवीन ट्रेडमार्क अर्जानुसार ही नावे ऑटोमोबाइल, मोटरसायकल, स्कूटर, दुचाकी, तीनचाकी वाहन आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी आरक्षित आहे. मात्र, रिपोर्टनुसार कंपनी या दोन नावांचा वापर इलेक्ट्रिक वाहनांसाठी करू शकते. मात्र, याबाबत अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

बजाजद्वारे ट्रेडमार्क करण्यात आलेला Fluir हा एक स्पॅनिश शब्द आहे. ज्याचा अर्थ स्ट्रीम/फ्ला म्हणजे ‘प्रवाह’ असा होतो. तर Fluor चा अर्थ ‘स्त्राव’ असा होतो. कंपनीचे आधीच पाच सब-ब्रँड बाजारात आहेत व याद्वारे अनेक बाइक्सची विक्री केली जाते. कंपनीने गेल्यावर्षी भारतीय बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर बजाज चेतकला लाँच केले होते. बजाजच्या या नवीन इलेक्ट्रिक बाइक्ससाठी ग्राहकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Exit mobile version