वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शाह यांना जामीन मंजूर !

न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच केला होता जामिनासाठी अर्ज

वरळी हिट अँड रन प्रकरणातील राजेश शाह यांना जामीन मंजूर !

वरळी हिट अँड रन प्रकरणी अटक करण्यात आलेल्या राजेश शाह यांना जामीन मंजूर झाला आहे. अपघात प्रकरणी राजेश शाह यांची अटक बेकादेशीर असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. राजेश शाह यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच राजेश शाह यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर कोर्टाने १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर राजेश शाह यांना जामीन मंजूर केला आहे.

पोलिसांनी राजेश शाह यांना आज (८ जुलै) न्यायालयात हजर केले होते. यावेळी कोर्टाने शाह यांची अटक बेकादेशीर असल्याचे नोंदवत त्यांना १४ दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी होताच राजेश शाह यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी अटक करण्यात आलेला गाडी चालक राजऋषी बिडावत याला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे ही वाचा:

मदनी यांच्या स्पष्टोक्तीनंतर तरी भाजपाचे डोळे उघडतील काय?

युक्रेनमधील मुलांच्या रुग्णालयावर रशियन क्षेपणास्त्र हल्ला

वरळी कार अपघात प्रकरण, राजेश शाहला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

रायगडमध्ये ढगफुटी सदृश पाऊस; किल्ल्याच्या पायऱ्यांना धबधब्याचं स्वरुप

दरम्यान, वरळी हिट अँड रन प्रकरणात दोषी असलेला मिहीर शाह अद्याप फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version