कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली असून या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. न्यायमूर्ती ए. एस. किल्लोर यांच्या एकलपीठाकडून हा निर्णय देण्यात आला आहे. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपी सचिन अंदुरे, गणेश मिस्कीन, अमित देगवेकर, भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने आता या सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे.
गोविंद पानसरे हत्या प्रकरणात या आरोपींना २०१८ ते २०१९ या दरम्यान पोलिसांनी अटक केली होती. आरोपी आतापर्यंत तुरुंगात होते. हा खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नाही, यामुळे आरोपींना जामीन मंजूर करण्यात आल्याचे न्यायालयाकडून सांगण्यात आले. याशिवाय तपासात लक्षणीय प्रगती न झाल्यामुळे आरोपी जामीनासाठी पात्र असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
हे ही वाचा :
बांगलादेशात १६ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण, पोलिसांकडून दुर्लक्ष!
राहुल गांधीचा अरविंद केजरीवालांवर निशाणा
सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीसाठी ट्रम्प यांनी स्पेसएक्सकडे मागितली मदत
महाकुंभ: मौनी अमावस्येला भाविकांचा महापूर, ४ कोटी भक्तांचे स्नान!
मेघा पानसरे म्हणाल्या की, न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात जायचं का? याबाबत वकिलांशी चर्चा करु. प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. तपास यंत्रणांना याबाबत अपयश आलं आहे. हा खटला जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे. हा खटला प्रदीर्घ काळ चाललेला आहे. नियमित सुनावणी घेऊन हा खटला संपवावा, असं मेघा पानसरे म्हणाल्या.