केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्त्यव्य केल्याबद्दल तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांनतर तिच्याविरोधात २२ तक्रारी दाखल झाल्या आहेत. पण दोन ठिकाणी केलेल्या एफआयआरवरून तिला अटक करण्यात आले होते. त्यातील तिला रबाळे पोलिस ठाण्याच्या अटकेसंदर्भात तिला जामीन मिळाला आहे. दरम्यान, केतकी चितळेच्या प्रकरणात पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना समन्स पाठवण्यात आले आहे.
केतकी चितळेला ठाणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र कळव्यात तिच्याविरोधात जो एफआयआर होता त्याप्रकरणात तिला अटक केली आहे. त्याची सुनावणी २१ जूनला होणार आहे. अट्रोसिटीच्या गुन्ह्यात केतकी चितळेला जामिन मंजूर झाला आहे. २५ हजार जात मुचलक्यावर केतकीचा जामीन मंजूर झाला आहे.
हे ही वाचा:
‘या’ कारणासाठी पंतप्रधान मोदी जाणार गांधीनगरला
उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार
‘मलिकांचं मंत्रीपद रद्द करा’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
दरम्यान, केंद्रीय महिला आयोगाकडून पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांना समन्स पाठवण्यात आले आहे. केतकी चितळेच्या अटक प्रकरणी त्यांना समन्स पाठवण्यात आले आहे. १७ जूनला शेठ यांना आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केतकीवर महाराष्ट्रात २२ ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. धुळे, पुणे, सिंधुदुर्ग, पिंपरी-चिंचवड, अकोला, मुंबईसह अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रारी दाखल आहेत.