बागमती एक्स्प्रेसला तामिळनाडूमध्ये अपघात; अनेक डबे घसरले

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

बागमती एक्स्प्रेसला तामिळनाडूमध्ये अपघात; अनेक डबे घसरले

तामिळनाडूमध्ये शुक्रवारी रात्री रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवरून खाली घसरले. तसेच ट्रेनच्या काही डब्यांना आगही लागली. म्हैसूर येथून दरभंगाच्या दिशेने जाणाऱ्या बागमती एक्स्प्रेसने ट्रॅकवर उभ्या असलेल्या मालगाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात एक्स्प्रेसचे अनेक डबे रुळांवरून खाली घसरले. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी १९ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री ८.३० ते ९ च्या दरम्यान हा भीषण अपघात झाला. चेन्नई रेल्वे विभागातील पोनेरी कावरपेट्टई विभागात एक्सप्रेस ट्रेन आणि मालगाडी यांच्यात धडक झाली आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हे ही वाचा:

हिज्ब-उत-तहरिर आता दहशतवादी संघटना!

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

टाटा ट्रस्टची धुरा आता नोएल टाटांकडे

माहितीनुसार, शुक्रवारी रात्री ८.३० सुमारास तिरुवल्लूर जिल्ह्यातील पोनेरी स्टेशननंतर म्हैसूर दिब्रुगड दरभंगा एक्सप्रेसला पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल देण्यात आला. पण कावरपेट्टाई स्थानकात प्रवेश करत असताना एक्स्प्रेस दिलेल्या सिग्नलनुसार मेन लाइनमध्ये जाण्याऐवजी ७५ किमी प्रतितास वेगाने लूपलाइनमध्ये गेली आणि तिथे उभ्या असलेल्या मालगाडीला धडकली. ही ट्रेन म्हैसूर येथून पेरम्बूरमार्गे बिहारमधील दरभंगाला जात होती. रात्री एक्सप्रेसने मालगाडीला धडक दिल्यानंतर गाडीचे १३ डबे रुळावरुन घसरले, तर काही डब्यांनी पेट घेतला. अपघाताची बातमी समजताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तसेच बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य वेगाने सुरू केले. या अपघातात आतापर्यंत १९ प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर अपघाताचे कारण शोधण्यासाठी म्हणून भारतीय रेल्वेकडून शनिवारी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version