बदलापूरमध्ये मुलींवर झालेल्या अत्याचारा विरोधात बदलापूर स्थानकावर करण्यात आलेल्या आंदोलनकर्त्यांना अखेर पांगवण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करत संपूर्ण परिसर रिकामा केला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक देखील झाली. या दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. या प्रकरणी अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत सर्व आंदोलकांवर लाठीचार्ज करून संपूर्ण बदलापूर रेल्वे स्थानक खाली केलं आहे. लाठीचार्जवेळी पोलिसांनी सुरक्षितपणे महिलांना बाजूला सारून ही कारवाई केली.
आंदोलकांनी जवळपास ९ तास रेल्वे सेवा ठप्प केली होती. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यंमत्री फडणवीस यांनी आरोपीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही हे आंदोलन सुरूच होते. या आंदोलनामुळे मध्य रेल्वे सेवेवर मोठा परिणाम झाला. आंदोलन कर्त्यांची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील बदलापूर स्थानकावर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन समजूत काढून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, आंदोलकांनी माघार घेतलीच नाही. त्यामुळे अखेर पोलिसांना आदोलकांवर लाठीमार करावा लागला. पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पळवून पळवून लाठीमार केला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवल्यानंतर काही आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेला दगडफेक केली.
दरम्यान, आंदोलनानंतर पोलिसांनी माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. पोलीस अधीकारी म्हणाले की, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. आंदोलक सकाळपासून रेल्वे रुळावर जमले होते. आंदोलकांना वारंवार विनंती केली जात होती. पण आंदोलक रेल्वे रुळावरुन हटण्यास तयार नव्हते. अखेर लाठीचार्ज करुन जमाव पाच मिनिटात रेल्वे रुळावरुन हटवण्यात आले आहे. हे ऑपरेशन होणे गरजेचे आहे. रेल्वे वाहतूक सुरु व्हायला हवी. यासाठी रेल्वे प्रशासनला आम्हाला अहवाल पाठवायचा आहे. यानंतर रेल्वे वाहतूक सुरु होईल”, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मीडियाला दिली.
हे ही वाचा :
टेक्सासमध्ये भगवान हनुमानाची ९० फूट उंची मूर्ती स्थापन !
बदलापुरातील हरामखोर नराधमाला फाशीच होणार…!
बांगलादेश : हिंदूंच्या रक्षणासाठी स्वतंत्र उपजिल्हा आणि बाजारपेठांची मागणी !
ओरडणार, बोंबलणार आणि शांत बसणार…