बदलापूर; आरोपीची आई म्हणते, ‘मुलगा दोषी असल्यास फाशी द्या’

या प्रकरणात अडकवत असल्याचा कुटुंबाचा आरोप

बदलापूर; आरोपीची आई म्हणते, ‘मुलगा दोषी असल्यास फाशी द्या’

बदलापूरच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणावर आरोपी अक्षय शिंदेच्या आईने भाष्य केलं आहे. माझ्या मुलाने काही चूक केली असेल तर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असे आरोपीच्या आईने म्हटले आहे. माझ्या मुलाने ‘त्या’ मुलीवर अत्याचार केले असावे असे मला वाटत नसल्याचे आईने म्हटले आहे.

मुख्यमंत्री शिंदे सरकारने या प्रकरणाची दखल घेत एसआयटी नेमली आहे. आरोपीवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्याला २६ तारखे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. या अगोदरही शाळेमध्ये अशा घटना घडल्या आहेत का? याचाही तपास पोलीस पथक घेत आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अधिकारी देखील बदलापूरमध्ये दाखल झाले आहेत.

हे ही वाचा :

बदलापूर प्रकरणात आता शाळेचे व्यवस्थापनही आरोपी; पॉक्सोअंतर्गत गुन्हा

मनू भाकरला ‘पॅरिस’स्पर्श; पुरस्कार, बक्षिसांमुळे संपत्तीत भरभक्कम वाढ!

अनिल अंबानींवर सेबीची कारवाई; पाच वर्षांसाठी बंदी, ठोठावला २५ कोटींचा दंड

नेपाळ : भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, १४ जणांचा मृत्यू !

दरम्यान, या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे हा आरोपी नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे. मुलाने काही चूक केली असेल तर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असे आरोपीच्या आईने म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली. हल्ल्यानंतर आरोपी अक्षय शिंदेचे कुटुंब फरार असल्याची माहिती आहे.

Exit mobile version