… हे आहे बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेमागचे खरे कारण

… हे आहे बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टर दुर्घटनेमागचे खरे कारण

देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा ८ डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत बिपीन रावत यांच्यासह लष्कराच्या १४ अधिकाऱ्यांनी आपला प्राण गमावला होता. अपघातामागचे कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी गठित करण्यात आली होती. या अहवालातून अपघाताच्या कारणाचा मोठा खुलासा झाला आहे. बिपीन रावत प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर हे खराब हवामानामुळे क्रॅश झाल्याचे समितीच्या अहवालातून समोर आले आहे.

एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही कमिटी तयार करण्यात आली होती. कमिटीने आपली चौकशी पूर्ण केली असून या तपासातून हवामान खराब असल्याकारणाने हेलीकॉप्टरचा दुर्दैवी अपघात झाल्याचे समोर आले आहे. लवकरच यासंदर्भातील अहवाल वायुसेना प्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेला राज्यपालांकडून दणका; आश्रय योजनेची होणार चौकशी

भारताची व्हॅक्सिन मैत्री पुन्हा सुरू; अफगाणिस्तानला दिले पाच लाख लसीचे डोस

कोरोनाचा विस्फोट; राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारच्या जवळपास

योगी आदित्यनाथ यांची जाहिरात कविता कृष्णन यांना झोंबली

दरम्यान, वायुसेनेकडून या अहवालाबाबत कोणतेही अधिकृत वृत्त प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. परंतु, माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार खराब हवामानामुळे वैमानिक विचलित झाले असावेत आणि त्यामुळे हा अपघात झाला. तांत्रिक भाषेत त्याला CFIT म्हणजेच ‘Controlled Flight Into Terrain’ म्हणतात.

हवाई दलाचे Mi-17V5 हे हेलिकॉप्टर सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर लष्करी अधिकारी यांना घेऊन कुन्नूरकडे जात होते. त्यावेळी हे हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले आणि या सर्व अधिकाऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला.

Exit mobile version