25 C
Mumbai
Saturday, December 21, 2024
घरविशेषमुंबईची काळी-पिवळी 'पद्मिनी प्रिमियर टॅक्सी' आता इतिहासात जमा!

मुंबईची काळी-पिवळी ‘पद्मिनी प्रिमियर टॅक्सी’ आता इतिहासात जमा!

मुंबईची प्रतिष्ठित पद्मिनी प्रिमियर टॅक्सीची सेवा सोमवार पासून बंद

Google News Follow

Related

‘पद्मिनी प्रिमियर टॅक्सी’ उद्या सोमवार ३० ऑक्टोबरपासून मुंबई शहरात धावणार नाहीये.मुंबईकरांची आवडती पद्मिनी प्रिमियर टॅक्सी आता इतिहास जमा झाली आहे.बेस्टकडून घेण्यात आलेल्या डबल डेकर बसच्या निवृत्तीनंतर आता मुंबईतील पद्मिनी प्रिमियर टॅक्सी दखल निवृत्त होणार आहे.

परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, शेवटच्या पद्मिनी प्रिमियर टॅक्सीची नोंदणी ताडदेव आरटीओत २९ ऑक्टोबर २००३ रोजी झाली होती. पद्मिनी प्रिमियर टॅक्सींना दिलेली २० वर्षांपर्यंतची आयुष्य मर्यादा संपल्याने शेवटच्या पद्मिनी प्रिमियरचा प्रवास संपला आहे. सध्या मुंबई शहरात काळी-पिवळी टॅक्सी म्हणून विविध कंपनीच्या टॅक्सी आहेत. परंतु ऐतिहासिक पद्मिनी प्रिमियर टॅक्सीचा प्रवास आता संपला आहे.

मुंबईतील शेवटची नोंदणीकृत असलेले प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचे मालक अब्दुल करीम कारसेकर हे प्रभादेवीचे रहिवासी आहेत.ते म्हणाले, ये मुंबई की शान है और हमारी जान है (हे मुंबईचे अभिमान आणि माझे जीवन आहे).”सार्वजनिक वाहतूकदार बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (BEST) च्या उपक्रमाअंतर्गत असलेली त्यांच्या ताफ्यातील शेवटची प्रतिष्ठित डिझेल-चालित डबल-डेकर बसने १५ वर्षांचा सेवेचा काळ पार केल्यानंतर निवृत्तीची घोषणा करत बाहेर पडली. त्यानंतर थोड्या दिवसांतच मुंबईची प्रतिष्ठित पद्मिनी प्रिमियर टॅक्सीची निवृत्ती लवकरच समोर आली आहे.

हे ही वाचा:

‘पुन्हा येईन’ व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांची उडवली खिल्ली

गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त

उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!

आधी हमासच्या नेत्याचे भाषण, दुसऱ्या दिवशी केरळमध्ये स्फोट

मुंबईतील डबल डेकर बसच्या निवृत्तीने तसेच लगेच आता ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावणार नसल्याने मुंबईतील वाहतूक प्रेमींनी खंत व्यक्त केली आहे.एखाद्या ‘प्रीमियर पद्मिनी’ टॅक्सीचे जतन करून संग्रहालयात ठेवण्याची मागणी काहींनी केली आहे.मुंबई शहरातील सर्वात मोठ्या टॅक्सी चालक संघटनांपैकी एक ‘मुंबई टॅक्सीमेन्स युनियन’ आहे.या युनियनने किमान एक काळी-पिवळी टॅक्सीचे जतन करण्यात यावे अशी मागणी काही वर्षांपूर्वी सरकारकडे केली होती.मात्र युनियनला यामध्ये यश आले नाही.

प्रदीप पालव हे परळचे रहिवासी ते एक कलाप्रेमी आहेत. ते म्हणाले, आजकाल प्रीमियर पद्मिनी टॅक्सी केवळ मुंबईच्या भिंतींवर दिसत आहेत.जरी ह्या टॅक्सी नाहीश्या झाल्या असल्या तरी लोकांच्या कल्पनेत आणि हृदयात त्याने स्थान मिळविले आहे,तो पुढे म्हणाला.“सध्या, आमच्याकडे टॅक्सी म्हणून अनेक कार मॉडेल्स आहेत, परंतु जेव्हा टॅक्सी रंगवण्याचा विचार येतो तेव्हा केवळ काळी-पिवळी प्रीमियर पद्मिनी आमच्या नजरेसमोर येते, कारण तिने जवळपास पाच दशके मुंबईच्या रस्त्यांवर राज्य केले आहे व तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, पालव म्हणाला.

दरम्यान, मुंबईत आता सुमारे ४० हजार काळ्या-पिवळ्या टॅक्सी आहेत. त्यात निळ्या-चंदेरी रंगाच्या वातानुकुलित कुल कॅबही आहेत. ९० च्या दशकात ६३ हजार टॅक्सी होत्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा