‘बचपन का प्यार’ या गाण्यातील प्रसिध्द कलाकार सहदेव दिरदो याचा अपघात झाला असून या अपघातात तो गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सहदेव याचा अपघात झाला. सहदेव हा आपल्या मित्रांसोबत दुचाकीवरून प्रवास करत होता. तेव्हा त्याची दुचाकी घसरून अपघात झाला आणि त्याच्या डोक्याला दुखापत झाली.
सहदेव हा आपल्या मित्रांसोबत शबरी नगरीला जाण्यासाठी प्रवास करत होता. तेव्हा रस्त्यावरच्या मातीमुळे दुचाकी घसरली. हेल्मेट नसल्यामुळे सहदेवच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. तेथील स्थानिक लोकांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, नंतर खासगी रुग्णालयात त्याला हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले
‘ठाकरे सरकारने डिग्री विकायला काढल्या तर आश्चर्य वाटणार नाही’
काय आहे पंतप्रधान मोदींच्या नव्या गाडीची खासियत?
छत्तीसगडमधील सहदेव हा त्याच्या ‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे प्रसिद्ध झाला होता. समाज माध्यमांवर त्याच्या या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याची दखल प्रसिध्द रॅपर बादशहाने घेऊन सहदेवसोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. सहदेव दिरदो हा ‘बचपन का प्यार’ या गाण्यामुळे प्रसिद्ध कलाकार बनला होता.