ऐकावे ते नवलच …… महिलेच्या यकृतामध्ये चक्क बाळ!

ऐकावे ते नवलच …… महिलेच्या यकृतामध्ये चक्क बाळ!

कॅनडा मध्ये एका महिलेच्या यकृतामध्ये बाळ वाढत असल्याचे आढळून आले आहे. अल्ट्रासाऊंडमध्ये याचा खुलासा झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की गर्भधारणा ही “अत्यंत दुर्मिळ” एक्टोपिक गर्भधारणा आहे. कॅनडातील मॅनिटोबाच्या चिल्ड्रन्स हॉस्पिटल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करणार्‍या बालरोगतज्ञ मायकेल नार्वे यांनी हे आश्चर्यकारक प्रकरण स्पष्ट केले आहे.

द सनच्या ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आईच्या यकृतामध्ये बाळाच्या वाढीच्या या असामान्य प्रकरणाची माहिती मायकेल मार्वे यांनी टिकटोकवर नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये दिली आहे. टिकटोकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, डॉक्टरांनी स्पष्ट केले की, ३३ वर्षीय महिला त्यांच्याकडे तिच्या गरोदरपणाचा तपास करण्यासाठी आली होती. मात्र, यकृतात बाळ सापडल्याने ते चक्रावून गेले.

हे ही वाचा:

अंडे नव्हे कोंबडीच आधी!  

यूपी प्लस योगी, बहोत है उपयोगी….. पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची चर्चा

विश्व हिंदू परिषद अमेरिकेचे संस्थापक डॉ.महेश मेहता यांचे निधन

सोनचाफ्याला आला सोन्याचा भाव! एक चाफा मिळतोय या किमतीला…

 

मायकेल नार्वे यांनी खुलासा केला की, महिलेच्या यकृतामध्ये ‘एक्टोपिक प्रेग्नेंसी’ होती आणि ते पुढे म्हणाले की, त्या महिलेचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले. तथापि, पिशवीला इजा झाल्यामुळे ते गर्भाला वाचवू शकले नाहीत. टिकटॉकवर पोस्ट केलेल्या व्हिडिओने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्याला 3 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर, सतरा हजारांहून अधिक कंमेंटन्ट मिळाल्या आहेत. द सन ने नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशने सांगितले की, यकृतातील एक्टोपिक गर्भधारणेची प्रकरणे “अपवादात्मकपणे दुर्मिळ” आहेत.

Exit mobile version