चांदेरे फौडेशन, राजमाता जिजाऊ संघ सतेज करंडकाचे मानकरी

राज्य स्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा  

चांदेरे फौडेशन, राजमाता जिजाऊ संघ सतेज करंडकाचे मानकरी
 उपमुख्यंमत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष व महिला सतेज करंडक कबड्डी स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी पुरुषांमध्ये बाबुराव चांदेरे फौंडेशन संघाने एनटीपीएस संघावर ४६- ३४ गुणांनी विजय मिळवित सतेज करंडकावर शिक्कामोर्तब केले.तर महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपद पटकाविले.
 
 
 
पुरुषांच्या गटात अंतिम फेरीत मध्यंतराला चांदेरे फौडेशन संघाकडे २३-१६ अशी आघाडी होती. चांदेरे फौडेशनच्या अजित चव्हाण याने आक्रमक खेळ करीत चढाईत १० गुण मिळविले, राम अडागळे याने पकडीत ७ गुण मिळविले, सुनिल दुबिले याने चढाईत ७ गुण मिळविले, अक्षय सुर्यवंशी चढाईत ६ गुण, ऋषिकेश भोजने पकडीत ५ गुण मिळविले. नंदुरबारच्या तेजस काळभोर चढाईत १२ गुण, ऋषिकेश बनकर याने चढाईत ५ गुण मिळविले. श्रेयस उंबरदंड पकडीत ३ गुण मिळविले. ओंकार गाडे विवेक राजगुरू प्रशांत नागरे यांनी प्रत्येकी पकडीत २ गुण मिळविले.
 
 
हे ही वाचा:
 
स्पेनमध्ये ५० वर्षांनी उजव्या विचारसरणीचे सरकार येण्याची चिन्हे
 
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांची पाटी कोरी, १८ जणांचे पथक जाणार
 
‘हेअरकट’मुळे वाढली डोकेदुखी
 
…आणि चोरांनी अडीच टन टोमॅटोचा ट्रकच पळवला!
 
 
 
महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या शिवशक्ती संघावर २७-१९ गुणांनी विजय मिळवित सतेज करंडकावर आपले नाव कोरले. मध्यंतराला दोन्ही संघाचा गुण फलक ८-८ असा समान गुणांवर होता. राजमाता जिजाऊ संघाच्या सलोनी गजमल व अंकिता जगताप यांनी अत्यंत सावध खेळ करीत आपल्या नावाला साजेसा खेळ करीत शिवशक्ती संघावर मात करीत विजेतेपद पटकाविले.
 
 
 
 
राजमाता जिजाऊ संघाच्या सलोनी गजमल व अंकिता जगताप यांनी शिवशक्तीचा बचाव भेदत शेवटपर्यंत त्यांचा जम बसू दिलाच नाही. मद्यंतरापर्यंत दोन्ही संघानी सावध खेळ केला होता. राजमातााच्या सलोनी गजमल हिने आक्रमक चढाई करीत ९ गुण मिळविले. तर अंकिता जगताप हिने चढाईत अष्टपैलू खेळ करीत चढाईत ४ गुण व ५ पकडी करीत ९ गुण मिळविले. कोमल आवळे हिने २ पकडी केल्या.
 
 
 
शिवशक्तीच्या पूजा यादव चढाईत ८ गुण व एक पकड करीत ९ गुण मिळविले व सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. तर रिया मांडकईकर ४ गुण मिळवित तीला साथ दिली. मात्र त्यांना बचाब पटूंची साथ मिळाली नसल्याने या दोघींचे प्रयत्न अपुरे ठरले त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
इनामे
 
विजेते
 
पुरुष : बाबुराव चांदेरे फौडेशन नांदेड, अडीच लाख
महिला : राजमाता जिजाऊ, पुणे,  अडीच लाख
 
उपविजेते
 
पुरुष : एनटीपीएस, नंदुरबार दीड लाख व चषक
महिला : शिवशक्ती मुंबई शहर दीड लाख व चषक
 
पुरुष : तृतीय क्रमांक- भैरवानाथ संघ पुणे, एक लाख व चषक
महिला : तृतीय क्रमांक -महात्मा गांधी मुंबई उपनगर एक लाख व चषक
 
चतुर्थ क्रमांक- पुरुष : वाघजाई रत्नागिरी एक लाख
महिला : महेशदादा स्पोर्टस् फौडेशन एक लाख
Exit mobile version