ओवैसींकडून लोकसभेत ‘बाबरी मशीद जिंदाबाद’चे नारे

राम मंदिर धन्यवाद प्रस्तावाबाबत चर्चा करताना दिल्या घोषणा

ओवैसींकडून लोकसभेत ‘बाबरी मशीद जिंदाबाद’चे नारे

राम मंदिराबाबत लोकसभेत धन्यवाद प्रस्तावाबाबत चर्चा सुरु असताना ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजेच एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. टीका करत असताना ओवैसी यांनी बाबरी मशीद जिंदाबाद असे नारे दिले.

अयोध्या आणि राम मंदिराबाबत बोलताना ओवैसी म्हणाले की, “मोदी सरकार केवळ एका धर्माचे सरकार आहे का? २२ जानेवारीचे सेलिब्रेशन करत तुम्ही देशातील मुस्लिमांना कोणता संदेश देत आहात? हे सरकार एका धर्माने दुसऱ्या धर्मावर विजय मिळलाय, असा संदेश देऊ इच्छित आहे का? १९९२, २०१९ आणि २०२२ मध्ये मुस्लिमांना धोका देण्यात आला आहे,” असं वक्तव्य त्यांनी केले.

ओवेसी म्हणाले की, “या देशाला कोणताही धर्म नाही असे मत आहे. १६ डिसेंबर १९९२ रोजी याच लोकसभेत एका प्रस्तावादरम्यान बाबरी विध्वंसाबाबत खेद व्यक्त करण्यात आला होता, अशी एक आठवण त्यांनी सांगितली. ६ डिसेंबर १९९२ रोजी देशात मोठा वाद झाला होता. युवकांना तुरुंगात डांबण्यात आले आणि म्हातारे झाल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. रामाचा आदर करतो, पण नथूरामबाबत मनात राग आहे. कारण त्याने अशा व्यक्तीची हत्या केली, ज्यांचे शेवटचे शब्द ‘हे राम’ होते. मला बाबरबाबत का विचारता? सुभाषचंद्र बोस, नेहरु आणि आपल्या देशाबाबत मला विचारा,” असेही ओवेसी यांनी म्हटले.

हे ही वाचा..

खलिस्तानी दहशतवाद्याच्या सहकाऱ्याच्या घरावर गोळीबार

लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए कायदा लागू होणार

उद्योगांना चालना देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामजाडेजा, केएल राहुल भारतीय संघात परतले

दरम्यान, लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांनी सीएएबाबत महत्त्वाचे भाष्य केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी सीएए लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याची अंमलबजावणीही केली जाईल, असे अमित शाह यांनी सांगितले आहे. अमित शाह म्हणाले की, “काँग्रेसने शेजारील देशातील अत्याचारित अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचं आश्वासन दिलं होतं. जेव्हा देशाची फाळणी झाली आणि तिथे अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले, तेव्हा सर्वांना भारतात पळून यायचं होतं, तेव्हा काँग्रेसनं सांगितलं होतं की, तुम्ही इथे या, तुम्हाला इथलं नागरिकत्व दिलं जाईल.”

Exit mobile version