एनसीईआरटीने १२ वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातील अयोध्या वादावरील प्रकरण लहान केले आहे. यामध्ये बाबरी मस्जिदचे नाव काढून त्याला ‘तीन घुमट रचना’ असे संबोधण्यात आले आहे. तसेच अयोध्येचा अध्याय चार पानांवरुन दोन पानांचा करण्यात आला आहे. हे सुधारित पुस्तक बाजारात आले असून यामध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अयोध्या वादाची माहिती देणारी जुनी आवृत्तीही काढून टाकण्यात आली आहे. यामध्ये भाजपची सोमनाथ ते अयोध्या अशी रथ यात्रा, कारसेवकांची भूमिका, बाबरी मशीद पाडल्यानंतर झालेला जातीय हिंसाचार, भाजपशासित राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट, अयोध्येत घडलेल्या घटनांबद्दल भाजपने व्यक्त केलेली खंत, अशा विविध घटनांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशच्या सीमेवरून महिन्याला २०० हून अधिक रोहिंग्यांची घुसखोरी
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याच्या राजस्थानमधून आवळल्या मुसक्या
वक्फ बोर्ड कायदा संपवावा, जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये बांधावीत!
दरम्यान, जुन्या पाठ्यपुस्तकात असे सांगण्यात आले होते की, बाबरी मशीद ही १६ व्या शतकातील मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने बांधलेली होती. आता नवीन पुस्तकात असे नमूद करण्यात आले आहे की, “श्री राम जन्मस्थानावर १५२८ साली बांधलेली तीन घुमट असलेली संरचना होती. परंतु, या संरचनेचे अंतर्गत आणि बाहेरील भाग हिंदू आहेत. चिन्हे आणि अवशेष स्पष्टपणे पाहिले जाऊ शकतात.”दरम्यान, नव्या सुधारित पुस्तकामध्ये बरेच असे बदल करण्यात आले आहेत.
अयोध्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा नव्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. ९ डिसेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या ५-0 निर्णयाचा उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्या निर्णयामुळे मंदिर उभारणीचा मार्ग तयार झाला होता. यावर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिराचे उदघाटन झाले.