पाठ्यपुस्तकातून बाबरीचा ‘ढाचा’ हटवून अयोध्येचे राममंदिर!

एनसीईआरटीने बदलला बारावीचा अभ्यासक्रम

पाठ्यपुस्तकातून बाबरीचा ‘ढाचा’ हटवून अयोध्येचे राममंदिर!

देशातील बारावीच्या वर्गातील मुले यापुढे त्यांच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्याबद्दलचा मजकूर वाचणार नाहीयेत.६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्याचा संदर्भ तीन ठिकाणांहून हटविण्याचा निर्णय एनसीईआरटीने घेतला आहे.त्याऐवजी राम मंदिर आंदोलन सविस्तर पणे शिकविले जाणार आहे.याशिवाय सुप्रीम कोर्टाने कोणत्या आधारावर राम मंदिराबाबत निर्णय दिला हे देखील शिकविले जाणार आहे.इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हे बदल पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यापासून प्रकाशित होणाऱ्या नवीन पुस्तकात दिसणार आहे.

एनसीईआरटीने गुरुवारी (४ एप्रिल) आपल्या वेबसाइटवर हे बदल जाहीर केले आहेत.बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकानुसार ‘भारताचे राजकारण-नवा अध्याय’ या आठव्या धड्यामध्ये अयोध्या वादाचा मजकुर हटवण्यात आला आहे. या धड्यातील ‘राम जन्मभूमी आंदोलन आणि अयोध्या वादावरील वादग्रस्त मजकूर हटवण्यात आला आहे.याबाबत एनसीईआरटीने म्हटले की, काळानुरुप बदल करण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्या कानपिचक्या: काँग्रेसने दिल्लीत राजकारण करावे, गल्लीत नव्हे!

पंतप्रधान मोदी म्हणाले, मी मुस्लिम कुटुंबांचे प्राण वाचवले!

राहुल गांधींना ‘उभे’ राहण्याचीही शिस्त नाही का?

हेमंता बिस्वा सरमा यांनी दिली इंडियन एक्सप्रेसला नोटीस

‘भारताचे राजकारण-नवा अध्याय’ या धड्यातील बाबरी मशीद आणि ‘हिंदूत्वाचे राजकारण’चे संदर्भही काढून टाकण्यात आले आहेत. ‘डेमोक्रेटिक राइट्स’ या शिर्षकाच्या पाचव्या प्रकरणात गुजरात दंगलीचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे.दरम्यान, एनसीईआरटीने आपल्या वेबसाईटवर म्हटले आहे की, राजकारणातील नवीन घटकांच्या आधारे सामग्री बदलण्यात आली आहे.विशेषतः अयोध्या प्रकरणाबाबत मोठे बदल करण्यात आले आहेत.कारण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने हा निर्णय दिला असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version