बबिता म्हणते, आंदोलक कुस्तीपटूंना वापरले जात आहे!

समिती गांभीर्याने आणि पैलवानांच्या सर्व वैध मागण्यांकडे लक्ष देईल

बबिता म्हणते, आंदोलक कुस्तीपटूंना वापरले जात आहे!

भारतीय कुस्तीपटू महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करून त्यांच्या अटकेची मागणी गेल्या काही दिवसांपासून आंदोलक कुस्तीपटू करत आहेत. मात्र कुस्तीपटू आणि भाजपच्या नेत्या बबिता फोगट यांनी कुस्तीपटूंचा वापर होत असून त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांवर केला आहे. त्यांनी सहकारी कुस्तीपटूंना सरकार आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे.

‘सरकार या विशेष तपासावर लक्ष ठेवून आहे. समिती गांभीर्याने आणि पैलवानांच्या सर्व वैध मागण्यांकडे लक्ष देईल,’ असे बबिता म्हणाल्या. स्वत: बबिता या प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारने स्थापन केलेल्या निरीक्षण समितीच्या सदस्य आहेत. त्यांच्या मते, कुस्तीपटूंचा वापर केला गेला आणि त्यांची दिशाभूल केली गेली.

गंगा नदीत पदकांचे विसर्जन करण्यासाठी कुस्तीपटू गेल्या आठवड्यात हरिद्वारला गेले होते. खाप आणि शेतकरी नेत्यांनी त्यांना असे न करण्यास सांगितले. नेत्यांनी त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी पाच दिवसांचा अवधी मागितला. मात्र कुस्तीपटूंचा वापर केला गेला, असे बबिता यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

मुस्लिम प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलीसोबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पाहिला ‘द केरळ स्टोरी’

मानेत खुपसलेला चाकू घेऊनच तो रुग्णालयात पोहोचला

राज्यातील निवडणुका भाजपा-शिवसेना एकत्र लढणार

एकाचा हात हाती दुसऱ्याला डोळा मारण्याच्या करामती; आंबेडकर सांगा कोणाचे?

‘मी तिथे असते तर असे काही घडू दिले नसते. जरी मला कुस्तीपटूंच्या पाया जरी पडावे लागले असते तरी मी ते केले असते. असे काहीतरी घडले याचे मला वाईट वाटते,’ असे बबिता फोगट म्हणाल्या. ‘ज्याने त्यांना (कुस्तीपटूंना) पदकांचे विसर्जन करण्याचे सुचवले, त्यांनी ते त्यांच्या भल्यासाठी केले नाही. ते कुस्तीपटूंच्या बाजूने नाहीत. तर, त्यांच्या विरोधात आहेत,’ असे बबिता म्हणाल्या.

बबिता यांनी कुस्तीपटूंची दिशाभूल करणाऱ्यांनाही फटकारले. “मला विचारायचे आहे की कुस्तीपटूंना अटक होत असताना विरोधक कुठे गेले? त्यांनी कुस्तीपटूंची दिशाभूल केली आणि पोलिस त्यांना अटक करत असताना ते पळून गेले,’ अशी टीका बबिता यांनी केली.

Exit mobile version