साक्षी मलिक म्हणते, बृजभूषणना हटविण्यासाठी बबिताने आंदोलनाची फूस लावली!

इंडिया टुडेच्या मुलाखतीत साक्षी मलिकचा मोठा खुलासा

साक्षी मलिक म्हणते, बृजभूषणना हटविण्यासाठी बबिताने आंदोलनाची फूस लावली!

भारताची ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने माजी खेळाडू आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या बबिता फोगटबद्दल मोठा खुलासा केला आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने दावा केला की, भाजप नेत्या बबिता फोगटने कुस्तीपटूंना ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले, कारण बबिताला भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष व्हायचे होते. सोमवारी (२१ ऑक्टोबर) इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कुस्तीपटू साक्षी मलिकने हा मोठा खुलासा केला आहे.

गेल्या वर्षीच्या सुरुवातीला विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात जंतरमंतरवर निदर्शने केली होती आणि त्यांच्यावर महिला खेळाडूंचे शोषण केल्याचा आरोप केला होता. या निषेधाला प्रोत्साहन देण्यामध्ये माजी महिला कुस्तीपटू बबिता यांचाही समावेश असल्याचे साक्षीने आता सांगितले आहे.

हे ही वाचा : 

क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रिग्जचे वडील करत होते धर्मांतरण; खार जिमखान्याचे सदस्यत्व रद्द

पंजाब दहशतवादी कट प्रकरण: दोन खलिस्तानी दहशतवाद्यांच्या प्रमुख साथीदारावर आरोपपत्र दाखल

…म्हणे मंदिरातील लाऊडस्पीकरमुळे ध्वनिप्रदूषण वाढते!

बैरुतमध्ये रुग्णालयाखाली असलेल्या नसरल्लाच्या बंकरमध्ये कोट्यवधीची माया

कुस्तीपटू साक्षी मलिक मुलाखतीत म्हणाल्या, काँग्रेसने आमच्या निषेधाला पाठिंबा दिल्याच्या अफवा आहेत, त्या सर्व खोट्या आहेत. खरं तर, भाजपच्या दोन नेत्यांनी आम्हाला हरियाणात आंदोलन करण्याची परवानगी मिळवून दिली होती, जे बबिता फोगट आणि तीरथ राणा आहेत. ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात सामना करण्यासाठी बबिता फोगटने आम्हाला भाग पाडले कारण, बबिताला ब्रिजभूषण सिंग यांच्या जागी बसायचे होते.

यासाठी बबिताने बैठक बोलविली, सर्व कुस्तीपटू खेळाडूंना बोलाविले, आम्ही तिच्या प्रभावाने हे सर्व केले नाही, पण महासंघात लैंगिक छळ आणि विनयभंगासारख्या घटना होत होत्या. आमचा विश्वास होता की एक महिला प्रभारी बनली तर चांगले होईल आणि तिच्या मनात देखील तेच होते, आम्हाला देखील याची जाणीव झाली होती. तसेच ती एक कुस्तीपटू होती, ती आम्हाला समजून घेईल, काहीतरी बदल करेल असा आम्हाला विश्वास होता, पण ती आमच्यासोबत एवढा मोठा खेळ खेळेल याचा आम्हाला अंदाज नव्हता. त्या पुढे म्हणाल्या, बबिता आमच्या सोबत आंदोलनाला बसेल आणि आवाज उठवले, कारण तिच्यावेळी देखील अशा काही घटना तिला ऐकायला मिळाल्या होत्या, बघायला मिळाल्या होत्या. मात्र, तसे काही झाले नाही.

Exit mobile version