बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!

झिशान सिद्दीकी देखील पक्ष सोडण्याची शक्यता

बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची झिशान सिद्दीकीवर कारवाई!

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा हात पकडला.बाबा सिद्दीकी अजित पवार गटात गेले मात्र काँग्रेसने त्यांच्या मुलावर कारवाई केली आहे.बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी हे आमदार आहेत.झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसचं अध्यक्षपद आहे.मात्र, काँग्रेसने झिशान सिद्दीकी यांना अध्यक्षपदावरून हटवलं आहे.

लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने असताना बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसला दणका दिला.काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात सामील झाले.बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसने सोडली मात्र पक्षाकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली.झिशान सिद्दीकी यांना मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून कमी करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

इसिसला भाजपा कार्यालये आणि हिंदू नेत्यांना करायचे होते लक्ष्य

फातिमा झाली कविता, अब्दुल्ला झाला शिवप्रसाद

शिंदे हसले जरांगे रुसले…

आदिवासीच्या ‘खबरी’मुळे गडचिरोली पोलिसांना कूकर बॉम्ब शोधण्यात यश

मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांनी पक्ष सोडल्यानंतर आमदार झिशान सिद्दीकीसुद्धा काँग्रेस पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.परंतु, अद्याप त्यांनी पक्ष सोडलेला नाही.झिशान सिद्दीकांना पदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी अखिलेश यादव यांना मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले आहे.तसेच काँग्रेसने देशातील काही राज्यांच्या युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत देखील बदल केले आहेत. यात मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुफियान मोहसिन हैदर यांची नियुक्ती करण्यात आलि आहे.

दरम्यान, झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक होते. १९९९, २००४ आणि २००९ मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री अशी काही खाती देखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे १९९२ आणि १९९७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीमध्ये महत्त्वाच्या पदावर होते.

Exit mobile version