बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’

बाबा सिद्दीकींची हत्येनंतर विरोधकांनी सत्ताधारी नेत्यांवर बोट ठेवत सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणी केवळ चौकशी नको तर राजीमाना द्या, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार पवारांना केली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका करत शरद पवारांना केवळ सत्तेची खुर्ची दिसत असल्याचे म्हटले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोंदियात असताना बोलत होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाबा सिद्दीकींबरोबर घडलेल्या घटनेमुळे आम्हासुद्धा धक्का बसला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहेत, त्यांची चौकशी सुरु आहे. काही धागेदोरे मिळत आहेत, त्यानुसार तपासणी सुरु आहे.

हे ही वाचा :

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

रेल्वे रुळावर सापडला ‘एलपीजी सिलिंडर’

बाबा सिद्दीकी हत्या, हल्लेखोरांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात येणार, हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई!

सरकार स्थापन करताचं धारावी प्रकल्प रद्द करणार

फक्त चौकशी नको सत्तेतून बाहेर पडा, असे शरद पवार म्हणत आहेत. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शरद पवारांना केवळ सत्ताच पाहिजे आहे, इतकी गंभीर घटना झाली आहे तरी देखील त्यांच्या नजरेसमोर फक्त खुर्ची आहे. मात्र, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची सुरक्षा, विकास आम्हाला पाहायचा आहे. त्यामुळे त्यांनी केवळ खुर्चीकडे पाहावे, असे फडणवीस म्हणाले.

या प्रकरणी प्रसार माध्यमे वेगवेगळे एंगल्स लावून बातम्या देत आहेत, मात्र अधिकृत असे काहीही नाही. तपास सुरु आहे, जस-जशी माहिती येईल तसे पोलिसांकडून कळवण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

Exit mobile version