बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणात मुंबई पोलिसांनी सांगितले की,लॉरेन्स बिश्नोईचा चुलत भाऊ अनमोल बिश्नोई याने हत्येच्या काही तास आधी सिद्दिकी यांच्या शूटर्सशी बोलणे केले होते, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. अहवालात म्हटले आहे की, अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दीकी यांच्या शुटरशी मेसेजिंग ॲपद्वारे संवाद साधला होता आणि सिद्दीकी आणि त्यांच्या मुलाचे फोटो शेअर केले होते.
पोलिसांनी सांगितले की शूटर आणि अनमोल बिश्नोई यांनी मेसेजिंग ॲप स्नॅपचॅटद्वारे संवाद साधला, जिथे गुंडाने बाबा सिद्दिकी आणि त्याचा मुलगा आमदार झीशान सिद्दिकीचे फोटो शेअर केले. ॲपद्वारे शेअर केलेले मेसेज आणि फोटो २४ तासांनंतर गायब झाल्याने स्नॅपचॅटचा वापर संभाषणासाठी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
हेही वाचा..
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दिवाळी कार्यक्रमादरम्यान राडा
कर्नाटकात निर्माणाधीन इमारत कोसळून पाच जणांचा मृत्यू
“आमचे संबंध इतके घनिष्ठ की, कोणत्याही अनुवादकाची गरज नाही”
पोलिसांनी सांगितले की, आम्ही दोन स्तर ओळखले आहेत – स्वतः शुटर आणि शस्त्र पुरवठा करणारे ते आहेत. आता, आम्ही तिसऱ्या थराच्या जवळ येत आहोत, ज्यात कट रचणारे आणि ज्यांनी हत्येचा करार केला आहे त्यांचा समावेश त्यात असू शकतो. मुंबई पोलिसांनी असेही म्हटले आहे की बाबा सिद्दीकी यांना मारण्याचे कंत्राट दिलेल्या शुटरनी हल्ला करण्यापूर्वी किमान पाच सत्र जंगलात बंदुकीचा सराव केला होता. सराव सत्रे सप्टेंबरमध्ये झाली, जिथे नेमबाजांनी झाडांना लक्ष्य केले होते.
बाबा सिद्दीकी यांना लक्ष्य करण्यापूर्वी शुटरनी कर्जत-खोपोली रोडवरील जंगलात शूटिंगचा सराव केला. कर्जत-खोपोली रोडवरील धबधब्याजवळील पलासदरी गावाजवळील जंगलातील एका झाडावर आरोपींनी गोळी झाडण्याचा सराव केला, असे मुंबई पोलिसांनी एएनआयला सांगितले.
बाबा सिद्दीक यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्व येथील त्यांचा मुलगा झीशानच्या कार्यालयाच्या इमारतीबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर काही वेळातच लॉरेन्स बिश्नोई टोळीचा संशयित सदस्य शुभम लोणकर याने या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी सोशल मीडिया पोस्ट अपलोड केली होती.
चौकशीदरम्यान, या प्रकरणातील एका आरोपीने सांगितले की, बाबा सिद्दीकी यांना लक्ष्य केले कारण तो “चांगला माणूस नव्हता” आणि त्याचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध होते. बॉलीवूड अभिनेता सलमान खानसोबतच्या जवळच्या वैयक्तिक संबंधांमुळे सिद्दीकी यांनाही लक्ष्य करण्यात आले होते, असे आरोपीने सांगितले.