बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’

आणखी एका आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु

बाबा सिद्दीकी हत्या: आरोपीची आजी म्हणते, ‘चौकात उभे करून गोळी घाला’

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी गुरमेल बलजित सिंह हा हरियाणातील कैथल जिल्ह्यातील नारदा गावाचा रहिवासी आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  आरोपी गुरमेल सिंग याच्यावर आणखी एका खुनाचा गुन्हा दाखल आहे. २०१९ मध्ये एका तरुणाच्या हत्ये प्रकरणी तो तुरुंगात होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने बाबा सिद्दीकी यांची हत्या केली.

या प्रकरणाची माहिती आरोपीच्या गावकऱ्यांना समजली तेव्हा त्यांना काहीच आश्चर्य वाटले नाही. कारण गावकऱ्यांना आरोपी गुरमेलच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची जाणीव होती. याबाबत आरोपीच्या आजीसोबत संवाद साधला असता आजी फुली देवी म्हणाल्या, गुरमेलला कधीच घराबाहेर काढले आहे. आमच्यासाठी तो आणि त्याच्यासाठी आम्ही कधीच मेलो आहोत. तुम्हाला हवे तर त्याला चौकात उभे करून गोळ्या घाला, असे आरोपीच्या आजीने म्हटले.

हे ही वाचा : 

‘जो सलमान, दाउदची मदत करणार त्याचा हिशोब करणार’

बाबा सिद्दीकींची घटना गंभीर, पण शरद पवारांच्या नजरेसमोर केवळ ‘सत्तेची खुर्ची’

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ!

रेल्वे रुळावर सापडला ‘एलपीजी सिलिंडर’

त्या पुढे म्हणाल्या, चार महिन्यांपासून तो गावात आलेला नाही, तो कुठे गेला याची आम्हाला माहिती नाही, तो काहीही सांगत नाही. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. दरम्यान, आरोपी गुरमेल याचे आई-वडील मरण पावले आहेत. त्याची आई त्याच्या सावत्र भावासोबत गावात राहते. दरम्यान, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. गुरमेल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील आणखी एकाचा शोध सुरु आहे.

पुरावे आहेत...शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाली होती! | Mahesh Vichare | Kaustub Kasture

Exit mobile version