देशात कोरोना आणि ओमायक्रोन बाधितांच्या संख्येचा विस्फोट झाला असून भारतात कोरोना संसर्गाची तिसरी लाट धडकल्याचे चित्र आहे. देशातील मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई या शहरांनी रुग्णसंख्येच्या पीकचा टप्पा पार केला असून आता इतर शहरे व ग्रामीण भागात संसर्ग वेगाने फैलावत आहे. अशावेळी नागरिकांना आणि प्रशासनाला चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे.
देशात एकीकडे ओमायक्रोनचे रुग्ण वाढत असताना ओमायक्रोनचा सब व्हेरिएंट BA.2 आढळून आला आहे. ओमायक्रोनचा समूह संसर्ग सुरू झाला असून आता हा नवा व्हेरिएंट देशातील अनेक भागात फैलावला असल्याची माहिती भारताच्या सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियम ( Indian SARS-CoV-2 Genomics Consortium ) यांनी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये देण्यात आली आहे.
‘भारतात कोरोना आणि ओमायक्रोन बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता ओमायक्रोन व्हेरिएंटने समूह संसर्गाची स्टेज गाठली आहे. महानगरांमध्ये या संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव दिसत असून तिथे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे,’ असे सार्स कोव्ह-२ जीनोमिक्स कन्सोर्टियमच्या बुलेटिनमध्ये नमूद करण्यात आले.
हे ही वाचा:
मुंबईच्या गाड्यांवर का पसरली पांढरी चादर?
सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कारांची घोषणा
चीन नरमला; अपहृत तरुणाची करणार सुटका
नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन
कोलकाता येथे सहा दिवसांतील ८० टक्के नमुन्यांमध्ये ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 आढळून आला आहे. २२ ते २८ डिसेंबर दरम्यान जीनोम सीक्वेन्सिंगसाठी हे सर्व नमुने पाठवण्यात आले होते. यात BA.1, BA.2 आणि BA.3 असे तीन उपप्रकार आहेत. BA.2 हा केवळ जीनोम सीक्वेन्सिंगच्या माध्यमातूनच त्याची लागण झाली आहे की नाही हे कळू शकते. BA.2 हा अजून ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ मानला गेलेला नसून वैज्ञानिक सध्या याचा अभ्यास करत आहेत. मात्र, सतर्क राहण्याचे आवाहन मात्र करण्यात आलेले आहे. ब्रिटनमध्ये या सब व्हेरिएंटचे ४२६ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत भारतासह ४० देशांत BA.2 चा फैलाव झाला आहे.