सपा नेते आझम खानला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, १४ लाखांचा दंडही ठोठावला!

डुंगरपूर प्रकरणात एमपी-एमएलए न्यायालयाचा निर्णय

सपा नेते आझम खानला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, १४ लाखांचा दंडही ठोठावला!

लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे.तत्पूर्वी समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे.रामपूरच्या एमपी-एमएलए न्यायालयाने समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.तसेच १४ लाखांचा दंडही ठोठावला आहे.

डुंगरपूर वसाहत प्रकरणात आझम खान यांना दोषी ठरवण्यात आले आहे.डुंगरपूर वसाहत बळजबरीने रिकामी करणे, प्राणघातक हल्ला, तोडफोड, लूटमार आणि धमकावणे असे आरोप आझम खान यांच्यावर आहेत.हे प्रकरण ६ डिसेंबर २०१६ चे आहे.या प्रकरणी आझम खान यांच्याविरोधात २०१९ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा..

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्ट्रिकची संधी…

‘मोदी जेव्हा तोंड उघडेल, तेव्हा तुमच्या सात पिढ्यांचा हिशेब करेल’

कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामललांचे दर्शन!

“केजरीवालांची प्रकृती खराब आहे तर ते निवडणुकीचा प्रचार का करतायत?”

या प्रकरणाची सुनावणी एमपी-एमएलए सत्र न्यायालयात सुरु होती.अखेर या प्रकरणात दोषी आढळल्यानंतर कोर्टाने आझम खान याना शिक्षा सुनावली.विशेष न्यायालयाचे (सत्र खटला) न्यायाधीश डॉ. विजय कुमार यांनी ही शिक्षा सुनावली आहे. आझम खान सध्या सीतापूर कारागृहात असून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कारागृहात हजर करण्यात आले होते.

तसेच बरकत अली या कॉन्ट्रॅक्टरलाही शिक्षा सुनावण्यात आली आहे.हा देखील या प्रकरणात दोषी आढळला आहे.बरकत अली याला न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा अन सहा लाखांचा दंड ठोठावला आहे.सरकारी वकील शिव प्रकाश पांडे म्हणाले की, ‘जबरदस्तीने घर रिकामे करून ते पाडण्याच्या प्रकरणात रामपूरच्या विशेष खासदार-आमदार न्यायालयाने सपा नेते आझम खान यांना १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे आणि १४ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

 

Exit mobile version