सरकार तर्फे ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात येत आहे. त्यासाठी देशातील शाळांना विविध उपक्रम राबवण्याचा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध उपक्रम राबवले जात आहेत. पुंछमधील एका शाळेत हा उपक्रम साजरा केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशातील इतर भागांप्रमाणे जम्मू काश्मीरमध्येसुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. पुंछ त्या शाळेत विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेत, एका पाठोपाठ उभे राहून देशाचा नकाशा साकारला आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी झेंडा हातात घेऊन प्रत्येक मजल्यावर उभे आहेत. यामध्ये एक शिक्षक माईकवरून ‘सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ताँ हमारा’ हे देशभक्ती गीत गात आहेत. शिक्षकाच्या पाठोपाठ सर्व विद्यार्थी गीत गात होते.
हे ही वाचा:
शिंदे फडणवीस सरकारमध्ये १८ कॅबिनेट मंत्र्यांनी घेतली शपथ
डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर ‘एफबीआय’चा छापा
‘जमाते इस्लामी’ संघटनेसंबंधित जम्मू काशमीरमध्ये NIA कडून छापेमारी
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी ठरला
देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन असल्याने देशात प्रत्येक गावात, शाळेत हा दिवस साजरा करण्यावर भर दिला जात आहे. औरंगाबादमधील बिडकीन येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी ३७५ मीटर लांब तिरंगा हातात घेत गावातून प्रभात फेरी काढली आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन गावातून भव्य अशी रॅली काढत आहेत. यावेळी विद्यार्थी देशभक्तीपर घोषणा देत आहेत. हर घर तिरंगा मोहिमेविषयी विद्यार्थी जनजागृती करत आहेत.