30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषआंध्रातील नेल्लोरमध्ये कोरोनावर आयुर्वेदिक औषध?

आंध्रातील नेल्लोरमध्ये कोरोनावर आयुर्वेदिक औषध?

Google News Follow

Related

कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरु आहे. कोविड-१९ वरील औषधासाठी संशोधन सुरु आहे.  तर दुसरीकडे आंध्र प्रदेशच्या एसपीएस नेल्लोर जिल्ह्यातील कृष्णपटणम या छोट्याशा गावात कोविड-१९ वरील आयुर्वेदिक औषधासाठी भलीमोठी रांग पाहायला मिळत आहे. झटक्यात कोरोना बरा करणाऱ्या या औषधासाठी आजूबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने इथे येतात.

बी आनंदय्या नावाच्या वैद्याने आपलं हे औषध कोरोनावर प्रभावी असल्याचा दावा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया व्हायरल झाला, परिणामी इथे दूरुन लोक येऊ लागले. इतकंच नाही तर शेजारच्या राज्यांमधूनही अनेक नागरिक हे औषध घेण्यासाठी येत आहेत. आनंदय्या यांनी तयार केलेल्या औषधाची तुलना हैदराबादमधील बथिनी बंधूंनी दमा बरा करण्यासाठी तयार केलेल्या ‘फिश प्रसादम’ औषधासोबत केली जात आहे.

दरम्यान हे आयुर्वेदिक औषध कोविड-१९ वर प्रभावी आहे का, यामुळे आजारी व्यक्ती बरा होतो का हे अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु तरीही मोठ्या संख्येने नागरिक या गावात औषधासाठी गर्दी करत आहेत. परंतु हे औषध घेण्यासाठी सोशल डिस्टन्सचा मात्र पुरता बोजवारा उडाला.

कृष्णपट्टणम कोरोना औषध असं या आयुर्वेदिक औषधाचं नाव आहे. आनंदय्या आपलं आयुर्वेदिक औषध लोकांना मोफत देत आहेत. शिवाय ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना आयड्राप देखील दिला जातो. या औषधाचे दोन थेंब डोळ्यात टाकल्यानंतर अवघ्या काही मिनिटात ऑक्सिजन पातळी वाढते, असा दावा केला जात आहे. तर गुळवेल, कडूनिंब, काळीमिरी, आलं आणि हळद यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या आयुर्वेदिक गोळ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिल्या जातात. तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही या गोळ्या दिल्या जात आहेत.

हे ही वाचा:

२०२१ च्या अखेरपर्यंत सर्व प्रौढांचे लसीकरण करणार

कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट

चक्रीवादळापेक्षा जास्त वेगाने मुख्यमंत्र्यांचा दौरा

इंडियन व्हेरिअंट नावावरून केंद्र सरकारने समाजमाध्यमांना झापले

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी कोविड-१९ संबंधित एका उच्चस्तरीय आढावा बैठकीत कृष्णपट्टणममधील औषधाबाबत माहिती घेतली. तर हे औषध प्रभावी आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही आयसीएमआर आणि इतर तज्ज्ञांमार्फत या औषधावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उपमुख्यमंत्री ए के के श्रीनिवास यांनी आढावा बैठकीनंतर सांगितलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा