राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!

लार्सन अँड टुब्रो बांधकाम कंपनीचा दावा

राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!

अयोध्येतील भव्य राम मंदीरात आज रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.हे मंदिर केवळ प्रार्थनास्थळ नाही तर ते प्राचीन श्रद्धा आणि आधुनिक विज्ञान यांचे मिश्रण आहे.मंदिराची पायाभरणी आणि बांधकाम अगदी मजबूत बांधण्यात आले आहे.जोरदार भूकंप आणि भीषण पूर अशा प्रत्येक वादळाचा सामना करण्यासाठी हे मंदिर सक्षम आहे, असा दावा लार्सन अँड टुब्रोने केला आहे.राम मंदिराचे बांधकाम इतके मजबूत आहे की पुढील १००० वर्षे मंदिर भक्कमपणे उभे राहणार आहे.

टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेडच्या व्यवस्थापनासह लार्सन अँड टुब्रोकंपनीद्वारे राम मंदिर बांधले जात आहे.या राम मंदिराला पुढची १००० वर्षे काहीही होणार नाही, तसेच नैसर्गिकआपत्तीचा सामना करण्यासाठी मंदिर सक्षम असणार आहे असा डाव बांधकाम कंपनीने केला आहे.राम मंदिराच्या निर्मितीसाठी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून गुलाबी बन्सी पहारपूरचे दगड आणले आहेत.आधुनिक लोखंड,पोलाद, आणि अगदी सिमेंटचा वापर न करता मंदिराचे बांधकाम दगडी स्वरूपात आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला

पंतप्रधान मोदी नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधले नसते!

राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेमुळे भारत नवी उंची गाठेल

उत्तर प्रदेशातील पर्यटन व्यवसाय चार लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता

 

हे मंदिर सर्वात शक्तिशाली भूकंप देखील सहजपणे सहन करण्यास सक्षम असेल. मंदिराच्या प्रत्येक बाजूला ३९० खांब आणि ६ मकराना संगमरवरी खांब आहेत. त्यामध्ये १० हजारांहून अधिक शिल्पे आणि थीम कोरण्यात आल्या आहेत.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, राम मंदिर ६.५ तीव्रतेपर्यंतचे भुकंप सहन करण्यास सक्षम आहे.१००० वर्षांपर्यंत मंदिराची दुरुस्ती करण्याची गरज भासणार नाही असा अंदाज आहे.मंदिर बांधणाऱ्या टीमने अयोध्या ते नेपाळपर्यंतच्या भागात आतापर्यंत झालेल्या भूकंपाची तीव्रता मोजली आहे.त्यानुसार मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे.

Exit mobile version