मोदींनी मीरा मांझींच्या हातचा चहा प्यायल्यावर त्या म्हणाल्या, माझा देव घरी आला!

अयोध्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींनी साधला दलित महिलेशी संवाद

मोदींनी मीरा मांझींच्या हातचा चहा प्यायल्यावर त्या म्हणाल्या, माझा देव घरी आला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील अयोध्याधाम रेल्वे स्थानकांचे उदघाटन केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी दोन अमृत भारत आणि सहा नवीन वंदे भारत गाडयांना हिरवा कंदील दाखवला. दरम्यान, पंतप्रधान मोदी अचानक एका दलित महिलेच्या घरी पोहचले. या महिलेचे नाव मीरा मांझी असे आहे. मीरा मांझी या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना योजनेच्या लाभार्थी देखील आहेत.

मीरा मांझी यांच्या टेढी बाजारातील घरी पंतप्रधान मोदी यांनी काही काळ मुक्काम करून मीरा मांझी यांच्या मुलांशी आणि कुटुंबियांशी संवाद साधला. विशेष म्हणजे मीरा मांझी यांनी पंतप्रधान मोदींना चहाही दिला. जेव्हा पंतप्रधान मोदी अचानक घरी आले तेव्हा मीरा मांझी म्हणाल्या, देव माझ्या घरी आला आहे. पंतप्रधान मोदी घरी आल्याने मीरा खूप खुश दिसत होत्या.

पंतप्रधान मोदी त्यांच्या घरी येणार असे सांगण्यात आले न्हवते.तासाभरापूर्वी त्यांच्या घरी कोणीतरी मोठा नेता येणार असल्याचे सांगण्यात आले होते.जेव्हा पंतप्रधान मोदी स्वतः मीराच्या घरी पोहचले तेव्हा संपूर्ण कुटुंब आणि परिसरातील आसपासचे लोक आनंदित झाले होते.मीराने स्वतः सांगितले की, पंतप्रधान मोदी घरी आले तेव्हा त्यांनी मला विचारले की घरी काय बनवले आहे? यावर मीराने उत्तर दिले की, तिने चहा बनवला आहे, तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले, कृपया मला चहा द्या.चहा पिताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चहा खूप गोड झाला आहे.

हे ही वाचा:

बाळासाहेबांच्या वक्तव्याचा आधार घेऊन बाबरी पतनाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न

जय श्री राम: पंतप्रधान मोदींनी १९९२ मध्ये हाती घेतलेला संकल्प अखेर पूर्ण!

मराठवाड्याची लेक करणार नव्या जालना- मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचे सारथ्य

ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांचा जन्मदिवस आता ‘राज्य क्रीडा दिन’

पंतप्रधानांनी मीरा मांझी यांनाही सरकारी योजनांच्या फायद्यांबाबत विचारणा केली.पंतप्रधान मोदी मीराच्या घरी उपस्थित होते तेव्हा तिथे मुलांची मोठी गर्दी जमा झाली होती.प्रत्येकजण त्यांच्यासोबत फोटो आणि ऑटोग्राफची मागणी करत होता, त्यावर मोदींनी काही मुलांसोबत फोटोही काढले आणि ऑटोग्राफही दिले.पत्रकारांशी संवाद साधताना मीरा म्हणाल्या की, देव माझ्या घरी आला आहे.पंतप्रधान मोदी आमच्या घरी आल्याने आम्ही खूप खुश असल्याचे त्या सांगत होत्या.

दरम्यान, पंतप्रधान मोदी शनिवारी ३० डिसेंबर रोजी अयोध्येत पोहोचले.उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांचे स्वागत केले.त्यानंतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल विमानतळाचे उदघाटन केले.

Exit mobile version