मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!

कामाच्या गतीत वाढ करण्याचा कामगारांना पंतप्रधानांचा उपदेश

मोदींकडून कामगारांवर पुष्पवर्षाव!

अयोध्येत प्रभू रामांचा अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंदिराच्या कामात गुंतलेल्या कामगारांची भेट घेतली.यावेळी पंतप्रधानांनी कामगारांवर फुलांचा वर्षाव केला आणि त्यांना प्रोत्साहन दिले.

अयोध्येत आज प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू रामांचा अभिषेक करण्यात आला.देशभरात आनंदाचे वातावरण आहे.अयोध्येत मोठ्या संख्येने भक्त उपस्थित आहेत.यावेळी पंतप्रधानांनी मंदिर कामगारांची भेट घेऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली अन त्यांना प्रोत्साहन दिले अन पुढे म्हणाले की, आतापर्यंत तुम्हा लोकांवर देवाचे आशीर्वाद होते. परंतु आता तुम्हाला संपूर्ण देशाचे आशीर्वाद मिळत आहेत.आता तुम्हाला तुमच्या कामाचा वेग वाढवावा लागेल, असे पंतप्रधान मोदींनी कामगारांना सांगितले.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या रूपाने ‘श्रीमंत योगी’ प्राप्त झाले आहेत

मुस्लिमांनी ज्ञानवापी आणि शाही ईदगाह हिंदूंच्या ताब्यात द्यावी!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडला प्रभू रामांचा अभिषेक सोहळा!

राममंदिर १००० वर्षे अविचल, अटल!

दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीचे बांधकाम वेगाने सुरु आहे.मंदिराचा आता पहिला टप्पा पार पडला असून आज २२ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामांचा अभिषेक करण्यात आला.यानंतर मंदिराचे बरेच काम पूर्णहोणे बाकी आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर कामगार रात्रंदिवस काम करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी या कामगारांची भेट घेऊन त्यांनी त्याच्या कामाचा वेग वाढवावा असा उपदेश पंतप्रधानांनी कामगारांना केला.मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्या राम मंदिरासाठी भक्तांकडून तीन हजार कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे.ही आकडेवारी २०२३ ची आहे.आतापर्यंत १२०० ते १३०० कोटी रुपये खर्च झाला असून मंदिराच्या पुढील बांधकामासाठी ३०० ते ४०० कोटी इतका खर्च होणार आहे.

Exit mobile version