ताजमहालपेक्षा लोकांना भावतेय अयोध्येचे श्रीराममंदिर!

पर्यटन स्थळात गाठले अव्वल स्थान

ताजमहालपेक्षा लोकांना भावतेय अयोध्येचे श्रीराममंदिर!

अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीमुळे उत्तर प्रदेशने पर्यटकांना आकर्षित करण्याचा नवा विक्रम केला आहे. यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ४७.६१ कोटी पर्यटकांनी राज्यातील विविध स्थळांना भेट दिली. या नऊ महिन्यांत प्रसिद्ध असलेल्या ताजमहालसह राज्यातील विविध पर्यटन स्थळांमध्ये अयोध्या अव्वल राहिले आहे.

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी सप्टेंबरपर्यंत अयोध्येला १३.५५ कोटी देशातील आणि ३,१५३ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. पर्यटकांच्या या वाढीचे प्रमुख कारण यंदा राम मंदिराचे उद्घाटन मानले जात आहे. अयोध्येच्या तुलनेत आग्राला १२.५१ कोटी पर्यटकांनी भेट दिली, ज्यामध्ये ११.५९ कोटी देशातील आणि ९२.४ लाख विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशचे पर्यटन मंत्री जयवीर सिंग यांनी राज्यातील पर्यटनाबाबत या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, “उत्तर प्रदेशने गेल्या वर्षी ४८ कोटी पर्यटकांचे स्वागत केले, जे यावर्षी केवळ नऊ महिन्यांत मैलाचा दगड ठरले आहे.”

हे ही वाचा :

ठाण्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या २५ बांगलादेशींना अटक!

५ वी, ८ वीच्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना नापास घोषित करण्यात येणार; ‘नो डिटेन्शन पॉलिसी’ रद्द!

राहुल गांधी म्हणतात, सूर्यवंशी यांची हत्या दलित म्हणून…भातखळकर म्हणाले, ही तर गिधाडे!

पूजा खेडकरवर अटकेची टांगती तलवार; अंतरिम जामीनासाठीची याचिका फेटाळली

अयोध्येशिवाय इतर अध्यात्मिक स्थळांनाही पर्यटकांची संख्या वाढली आहे. वाराणसीला ६.२ कोटी देशांतर्गत आणि १.८४ लाख विदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे. मथुरेला ६.८ कोटी पर्यटकांनी भेट दिली, ज्यामध्ये ८७,२९९ हजार विदेशी पर्यटकांचा समावेश आहे. कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रयागराजला ४.८ कोटी पर्यटकांनी भेट दिली, मिर्झापूरला १.१८ कोटी पर्यटकांनी भेट दिली.

याशिवाय २०३४ पर्यंत पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात ६१ लाखांहून अधिक नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. सध्याची आकडेवारी पाहता देशातील पर्यटन क्षेत्रात वाढ होत असल्याचे दिसत आहे. सध्या भारताच्या एकूण रोजगारामध्ये पर्यटन क्षेत्राचा सुमारे आठ टक्के वाटा आहे.

Exit mobile version