मुख्यमंत्री योगींची इच्छा पूर्ण, अयोध्या रेल्वे स्थानक बनले ‘अयोध्याधाम’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे खासदार लल्लू सिंह यांनी मानले आभार

मुख्यमंत्री योगींची इच्छा पूर्ण, अयोध्या रेल्वे स्थानक बनले ‘अयोध्याधाम’!

अयोध्या जंक्शनचे नाव बदलण्यात आले आहे.अयोध्या रेल्वे स्थानक आता ‘अयोध्या धाम’ म्हणून ओळखले जाणार आहे.३० डिसेंबरला पंतप्रधान मोदी त्याचे उद्घाटन करणार आहेत. सीएम योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी पाहणीदरम्यान स्टेशनचे नाव बदलण्याची इच्छा रेल्वे अधिकाऱ्यांकडे व्यक्त केली होती.मुखमंत्री योगी आदित्यनाथ यांची इच्छा पूर्ण झाली असून अयोध्या रेल्वे स्थानक आता ‘अयोध्या धाम’ म्हणून ओळखले जाणार आहे.यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये योगी आदित्यनाथ सरकारने फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नाव ‘अयोध्या कॅंट’ असे ठेवले होते.

भाजप खासदार लल्लू सिंह यांनी सोशल मीडियावर अयोध्या स्थानकाचे नाव बदलण्याची माहिती दिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खासदार लल्लू सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचेही आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

बाजारात तुरी… पण संपत नाही हाणामारी

काशीच्या संतांकडून २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टीची मागणी!

पक्षविरोधी वक्तव्य भोवले, हाजरा यांची भाजपा सचिवपदावरून हकालपट्टी!

मराठी माणसाच्या घरांचे कट-कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही!

दरम्यान,अनेक रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यात आली आहेत. नुकताच उत्तर प्रदेशातील गोमती नगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे. फैजाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या करण्यात आले. अलाहाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून प्रयागराज जंक्शन करण्यात आले. प्रतापगड रेल्वे स्थानकाला माँ भेला देवी धाम असे नाव देण्यात आले. तर मुघलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे जंक्शन असे करण्यात आले.

Exit mobile version