योगी सरकारने अयोध्येतील परिक्रमा परिसरात दारूबंदीची घोषणा केली आहे.उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल यांनी सांगितले की, रामनगरीतील चौरासी(८४) कोसी परिक्रमा परिसरात मद्यविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.परिसरातील सर्व दुकाने काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अयोध्या राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना भेटण्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री नितीन अग्रवाल आले होते.बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, श्री राम परिसर आधीच दारू मुक्त करण्यात आला आहे.चौरासी कोसी परिक्रमा परिसरातील सर्व दारूची दुकाने हटवण्याचे दुकानदारांना सांगण्यात आले आहे.तशा उत्पादन शुल्क विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.अयोध्येसोबतच फैजाबाद, बस्ती, आंबेडकर नगर, सुलतानपूर या भागांचाही श्री रामजन्मभूमीच्या चौरासी कोसी परिक्रमा मार्गात समावेश करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
रामलल्लाच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ४० सूर्यस्तंभ झगमगणार!
इस्रायली लष्कराकडून गाझा पट्टीमध्ये बॉम्बवर्षाव!
डम्परला धडकून बस पेटली; १२ जणांचा होरपळून मृत्यू!
प्रियांका गांधी- वड्रा पती पत्नी ईडीच्या कचाट्यात
संपूर्ण अयोध्या महानगर क्षेत्रात ही बंदी लागू नसल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले. फक्त चौरासी कोसी परिक्रमा मार्गावर ही बंदी लागू असणार आहे.या परिसरात एकूण ५०० हून अधिक दारूची दुकाने असल्याचे सांगण्यात येत आहे.दारूबंदीची घोषणा झाल्यानंतर ही सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत.त्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.ही दुकाने इतरत्र हलवली जाणार आहेत.
दरम्यान, २२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.अयोध्येत रामल्लाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरु आहे.अभिषेक करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री राम विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी ३० डिसेंबरला अयोध्येत येणार आहेत.