यूपीच्या अयोध्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. राम मंदिरातून एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाच्या चष्म्यात कॅमेर बसवलेले होते. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तो रामजन्मभूमी परिसराची छायाचित्रे काढत होता. याच दरम्यान, सुरक्षा रक्षकांच्या हे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
जयकुमार असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो वडोदरा येथील रहिवासी आहे. या तरुणाच्या चष्म्यात कॅमेरा बसवला होता. हा तरुण रामजन्मभूमी संकुलात या कॅमेऱ्याने फोटो क्लिक करत होता. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा दलाने संशयावरून चष्मा तपासला असता चष्म्यांमध्ये कॅमेरा आढळून आला.
गुप्तचर यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचा अद्याप कोणताही गुन्हेगारी इतिहास समोर आलेला नाही. तसेच जप्त करण्यात आलेल्या चष्म्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रभू रामांच्या दर्शनासाठी हजारो भाविक रोज अयोध्येत दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत भाविक आणि मंदिराच्या सुरक्षेचा विचार करून पोलीस सतर्क आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची तपासणी केली जाते.
हे ही वाचा :
समाजसुधारक वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव ५ कोटीच्या घरात!
इंडोनेशिया BRICS चा नवा सदस्य!
दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्चीची गिरगावमधील कोट्यवधींची मालमत्ता जप्त
नेपाळमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप; दिल्ली, बिहार, सिक्कीममध्ये जाणवले धक्के