गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील डीसा जीआयडीसी परिसरात मंगळवारी एका फटाका गोदामाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, ही आग जलतापन बॉयलरमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागली असण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत अनेक मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. डीसा नगरपालिकेच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. डीसा तालुका पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
हेही वाचा..
गुजरातमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू
टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकार जप्त करणार
टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकार जप्त करणार
पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही!
आग एवढ्या वेगाने पसरली की गोदामातील लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. फॅक्टरीचा स्लॅब कोसळल्यामुळे बचाव कार्य अडथळ्यात आले. आगीमुळे परिसरात घबराट पसरली आणि लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. बनासकांठा कलेक्टर मिहिर पटेल यांनी सांगितले, आज सकाळी डीसा औद्योगिक क्षेत्रात मोठ्या स्फोटाची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बनासकांठा एसपी अक्षय राज मकवाना यांनी स्पष्ट केले की, ही दुर्घटना एका गोदामात घडली, जे अवैधरित्या चालवले जात होते. प्रशासनाने या ठिकाणी फटाक्यांचा साठा करण्याची परवानगी दिली नव्हती, तरीही तेथे मोठ्या प्रमाणात फटाके साठवले गेले होते. याप्रकरणी गोदाम मालकाला अटक करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत आणि अधिकृत तपास सुरू आहे. ही घटना गंभीर असल्याने प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे.