राज्य सरकारच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या खेळाडूंची शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी किंवा निम सरकारी कार्यालयात थेट नियुक्ती करण्यात यावी यासाठी पात्र खेळाडूंनी महाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलात आमरण उपोषण सुरू केले आहे.
विकास काळे, सागर गुल्हाने, नेहा ढेपे, लौकिक फुलकर हे खेळाडू उपोषणाला बसले असून इतर अजून १०४ खेळाडू नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून या खेळाडूंनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी करूनही त्यांना केवळ आश्वासन मिळाले आहे.
हे ही वाचा:
रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे
अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षा रक्षकाला दीड कोटी मिळतच नव्हते
पुण्यातील १८०० शाळा अंधारात चाचपडत
… तर २४ तासात एसटी कर्मचाऱ्यांना कामातून कमी करणार
राज्य सरकारने त्यांच्या खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राज्यातील सर्वोच्च पुरस्कार दिला असून अजूनही त्यांच्या उदार्निवाहाचा प्रश्न आहे. गेल्या तीन दिवसांपासून हे खेळाडू पुण्यामध्ये उपोषण करत आहेत. राज्य शासनाचे खेळाडूंच्या बाबतील असलेले धोरण हे उदासीन असल्याचे खेळाडूंनी म्हटले आहे.
ऑलिम्पिकमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळल्यास तुम्हाला नोकरी मिळेल असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र सरकारकडून काहीही प्रतिसाद न आल्यास पुरस्कार परत करू असेही खेळाडूंकडून सांगण्यात आले आहे. पंजाब, हरियाणामध्ये खेळाडूंना उत्तम सुविधा दिल्या जातात. महाराष्ट्रामध्ये खेळाडूंना आणि खेळाला किंमत दिली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने पुरस्कार मिळाला असताना तोच घेऊन उपोषणाला बसावे लागत असल्याचे लज्जास्पद आहे, असे खेळाडूंनी म्हटले आहे.