जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; जैश-ए-मोहम्मदच्या ६ सहकाऱ्यांना अटक!

आईडी, शस्त्रे, दारूगोळा जप्त

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश; जैश-ए-मोहम्मदच्या ६ सहकाऱ्यांना अटक!

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. अवंतीपोरामध्ये पोलिसांनी जैश-ए-मोहम्मदच्या ६ साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून आयईडी, शस्त्रे, दारुगोळा अन्य वस्तू जप्त केल्या आहेत. जम्मू-काश्मीरच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना तरुणांना सामील करून घेण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणी कारवाई पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

हे मॉड्यूल काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी तरुणांना तयार करत होते. यासाठी पाकिस्तान स्थित काश्मिरी दहशतवादी अशा तरुणांवर नजर ठेवून होता, जे संघटनेत सामील होण्यास तयार आहेत. अशा तरुणांचा शोध घेतल्यानंतर त्यांना संघटनेत सामील होण्यापूर्वी दहशतवादी कारवाया करण्यासाठी शस्त्रे, दारुगोळा, स्फोटके पुरविली जात होती. या तरुणांना पैशाचेही आमिष दाखवून तयार केले जात होते. दरम्यान, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला, गुप्त माहितीच्या आधारे ६ जणांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून ५ आयईडी, ३० डिटोनेटर, १७ आयईडी बॅटरी, २ पिस्तूल, ३ मॅगझिन, २५ गोळ्या, ४ ग्रेनेड आणि २० हजार रुपये रोख जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा : 

दहशदवादी गोळ्या झाडायचे तेव्हा काँग्रेस पांढरे झेंडे दाखवायची

‘मोहम्मद युनूस’ हे हिंदूंचे मारेकरी!

पाकिस्तानमध्ये शिया आणि सुन्नीमधील वाद विकोपाला !

जगन मोहन रेड्डी यांनी तिरुपती मंदिराची यात्रा रद्द केली

Exit mobile version