महाराष्ट्र रायफल असोसिएशन मुंबई (वरळी) येथे झालेल्या २७ व्या कॅप्टन एस.जे. इझीकल राज्यस्तरीय रायफल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत टार्गेट फॉर गोल्ड रायफल शूटिंग अकॅडमी सांगली येथील खेळाडू अवनीश सुरेंद्र पाटील याने १० मीटर एअर रायफल प्रकारात ४०० पैकी ३९१ गुण मिळवत सब-युथ, युथ, ज्युनिअर व सिनियर या चारही वयोगटांमध्ये चार सुवर्णपदके मिळवली.
अवनीश सुरेंद्र पाटील हा इयत्ता ७ वी मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, सांगली येथे शिकत आहे. त्याचे प्रशिक्षक प्रवीण गुरव, प्राचार्य गणेश पाटील यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
हेही वाचा..
भाजपा आमदार मंगेश चव्हाणना धमकी देणाऱ्या जोर्वेकरांविरोधात आंदोलन!
भय्यू नावाने फसवून अर्शदने केला लव्ह जिहाद
नीट परीक्षा घोटाळा लातूर कनेक्शन, चौघांना अटक!
पंतप्रधान मोदींनी लोकसभेच्या सदस्यत्वाची घेतली शपथ!
अवनीश पाटील हा जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक सुरेंद्र पाटील यांचा मुलगा असून त्याचे शासकीय, राजकीय, सामाजिक अशा सर्व क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे. तसेच त्यांची प्री-नॅशनल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.