अविनाश साबळेने रचला इतिहास, ३,००० मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा ठरला पहिला भारतीय !

७ ऑगस्टला होणार अंतिम फेरी

अविनाश साबळेने रचला इतिहास, ३,००० मीटर स्टीपलचेस अंतिम फेरीत पोहोचणारा ठरला पहिला भारतीय !

पॅरिस ऑलम्पिकमध्ये भारतीय खेळाडू आपली दमदार कामगिरी दाखवत आहेत. आतापर्यंत भारताला तीन कांस्यपदक मिळाले आहेत. भारताला खात्यात आणखी एका पदाची भर पडणार आहे. पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने अंतिम फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे अविनाश ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या ३००० मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय ठरला आहे.

अविनाश पाचव्या क्रमांकावर राहून पात्र ठरला. अविनाश साबळेनं ८ मिनिट १५.४३ सेकंदात पात्रता फेरी पूर्ण करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. तर मोरोक्कोच्या मोहम्मद टिंडौफतने ८ मिनिटे १०.६२ सेकंद अशी सर्वोत्तम कामगिरी करत अव्वल क्रमांक पटकावले. ७ ऑगस्ट अंतिम फायनल असणार आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशातील इस्कॉन मंदिराची तोडफोड करून मंदिर पेटवले

“बांगलादेशातील एक कोटी हिंदू निर्वासितांना आश्रय देण्यासाठी तयार राहा”

सत्ताधारी अवामी लीगचा खासदार मशर्फे मूर्तझाचे घर जाळले; नेते शाहीन चकलादार यांचे हॉटेल पेटवले

“शेख हसीना कदाचित बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत”

अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर अविनाश म्हणाला की, उपांत्य फेरीत प्रवेश करुन चांगले वाटले. वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत ज्या चुका झाल्या होत्या त्या यावेळी टाळल्या. यावेळी जी एनर्जी वाचवली आहे ती अंतिम फेरीत वापरणार आहे, असे अविनाश म्हणाला. दरम्यान, अविनाश साबळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील असून तो सध्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे.यापूर्वीच्या स्पर्धांमध्ये झालेल्या चुका बाजूला ठेवून अविनाश साबळे यानं सुरुवातीपासून आघाडी घेतली होती.

Exit mobile version