पॅरालिम्पिकमध्ये २ पदकं मिळवणारी पहिली ऍथलिट
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या अवनी लेखराने पुन्हा एकदा कमाल करुन दाखविली आहे. तिने शुक्रवारी ५० मीटर राइफल ३ पोजिशन एसएच १ स्पर्धेत कांस्य पदकाचा वेध घेतला. ४४५.९ गुणांसह तिने या स्पर्धेत तिसरे स्थान मिळवले. अवनीच्या या कामगिरीमुळे टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताची पदकसंख्या १२ वर जाऊन पोहोचली आहे.
यापूर्वी अवनी लेखराने १० मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल ठरलं होतं. अवनीच्या या कामगिरीने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीवर स्तुतीसुमनं उधळली होती.
More glory at the Tokyo #Paralympics. Elated by the stupendous performance of @AvaniLekhara. Congratulations to her on bringing home the Bronze medal. Wishing her the very best for her future endeavours. #Praise4Para
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2021
अवनी लेखरा ११ वर्षांची होती तेव्हा तिचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आलं. अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे. तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं. त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली. अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचं प्रतिनिधित्व केलं.
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताचा धमाका सुरुच आहे. भारताचा ऍथलिट प्रवीण कुमारने देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकलं आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या टी४४ उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेलं हे तिसरं पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदकं जिंकली होती. आता प्रवीण कुमारच्या पदकासह भारताच्या ताफ्यात ११ वं पदक जमा झालं आहे. यामध्ये ६ रौप्य पदकांचा समावेश आहे.
प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी ६४ स्पर्धेत २.०७ मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने २.१० मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने २.०४ मीटरसह कांस्य पदक जिंकले.
हे ही वाचा:
वसूलीखोर ठाकरे सरकार उद्योग विरोधी
पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक
२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत
प्रवीणने आधी १.८३ मीटर, नंतर १.८८ मीटर उंच झेप घेतली. त्यानंतर त्याने १.९३ मीटर आणि १.९७ मीटरच्या मार्कला स्पर्श केला. प्रवीण त्याच्या पहिल्या प्रयत्नात २.०१ मीटर उंच उडी घेण्यात अयशस्वी झाला, परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याने पार केला. त्यानंतर पहिल्या प्रयत्नात त्याने २.०४ मीटर पार केले. २.०७ मीटरचा टप्पाही त्याने पहिल्याच प्रयत्नात पार केला. त्यानंतर बार २.१० मीटर पर्यंत वाढवण्यात आला, मात्र प्रवीण सर्व ३ प्रयत्नांमध्ये पार करण्यात अयशस्वी ठरलला. ब्रूम-एडवर्ड्सने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात उंच उडी घेत सुवर्णपदकावर मोहर उमटवली.