अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी

अवनी लेखराची सुवर्ण कामगिरी

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिची सुवर्ण कामगिरी पाहायला मिळत आहे. १० मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळालं आहे. दरम्यान, अवनी लेखरानं क्वॉलिफिकेश राउंडमध्ये सातवं स्थान पटकावलं होतं. अवनीनं यासोबतच आणखी एक इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली आहे.

अवनी लेखराने फायनलमध्ये २४९.६ पॉईंट्स मिळवले. अवनीच्या या कामगिरीने पॅरालिम्पिक्समधील नवा रेकॉर्ड बनला आहे. अवनीला फायनलमध्ये चीनच्या नेमबाजाने जोरदार फाईट दिली. मात्र गोल्डन ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या अवनीने सुवर्ण पदक मिळवूनच मैदान सोडलं. चीनच्या झांगने २४८.९ गुणांसह दुसरं स्थान मिळवत, रौप्य पदक पटकावलं.

अवनी लेखरा ११ वर्षांची होती तेव्हा तिचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आलं. अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे. तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं. त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली. अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचं प्रतिनिधित्व केलं.

हे ही वाचा:

ऐरोलीत नेलेला मासळी बाजार पुन्हा आला मूळ ठिकाणी; कसा झाला हा चमत्कार?

जन धनधनाधन; योजनेचा लाखो कुटुंबियांना लाभ

उद्धव ठाकरेंविरोधात कानपूरमध्ये तक्रार; वाचा सविस्तर…

बाळासाहेब गेल्यावर ठाकरी शैलीही संपली!

टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताची आजची सुरुवात जबरदस्त झाली आहे. आज अवनी लेखरानं सुवर्णपदक जिंकल्यानंतर योगेश कठुनियानं थाळीफेकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलं आहे. योगेशनं ४४.३८ मीटर थाळीफेक करत पदकावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी भारताच्या अवनी लेखरानं १ मीटर्स एअर रायफल्समध्ये सुवर्ण वेध घेत भारताला सुवर्णपदक जिंकून देत आजच्या दिवसाची शानदार सुरुवात करुन दिली होती.

Exit mobile version