मुंबईमधील बोरिवली,चेंबूर,मुलुंड,पवई,वरळी आदी ठिकाणी हवामान केंद्र आहेत.मात्र या केंद्रावर झालेली कमाल तापमानाची नेमकी नोंद मुंबईकरांसाठी संध्याकाळी अद्ययावत होणाऱ्या तापमान तक्त्यामध्ये उपलब्ध होत नाही.त्यामुळे या यंत्रणेवर इतका पैसे खर्च करून काय उपयोग असा प्रश्न उपस्थित होत आहे.ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूनंतर आता खारघरमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा विचार पुढे आला आहे.
यासाठी नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाखोंनी श्रीसदस्यांची उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्यामुळे समोर बसलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हात ६ ते ७ तास बसून राहावं लागलं. त्यामुळे उष्माघातामुळे त्यातील १४ जणांना उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेनंतर तातडीने स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती प्रादेशिक विभागाकडून देण्यात आली.
हे ही वाचा:
तब्बल चार कोटींचे आयफोन लंपास!
भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक
अहो, उद्धव ठाकरे, तुमची ब्लू टीक नऊ महिन्यांपूर्वीच गेली…
कृतयुग किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ म्हणजे अक्षय (अक्षय्य) तृतिया
हवामान विभागाचे महासंचालक डॉ.मोहपात्रा म्हणाले ,वाढत्या जागतिक तापमानवाढीच्या स्थितीमध्ये देशात अधिकाधिक स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत.या संदर्भात अधिक माहिती देताना मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे यांनी नजीकच्या काळात खारघर येथे स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करणार असल्याचे सांगितले.ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच राज्यभरात ज्या अन्य ठिकाणी अशा केंद्रांची गरज आहे ,अशा ठिकाणांचे सर्वेक्षण करून आठ ते दहा ठिकाणी केंद्रे उभारण्यात येणार आहे.
एक केंद्र उभारण्यासाठी सुमारे पाच लाख इतका खर्च येतो.तापमानाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना तापमान ,पाऊसमान याची माहिती मिळवण्याची अधिक उत्सुकता असल्याचे समोर आले आहे.हवामान केंद्रे म्हणजे हवेचे तापमान, वातावरणाचा दाब, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता आणि वाऱ्याची दिशा यासारख्या विविध हवामानविषयक चलांचे वक्तशीरपणे मोजमाप आणि रेकॉर्ड करण्याच्या हेतूने उपकरणे असलेली सुविधा.
त्यासाठी ही यंत्रणा खासगी स्तरावर उभारण्याचा प्रयत्न होतो.मात्र काही ठिकाणी ही यंत्रणा हवामान विभागाच्या निर्धारित निकषांनुसार नसते.काही वेळा ही यंत्रणा गच्चीवर उभारली जाते.सिमेंट,काँक्रीटमुळे तापमानात फरक पडतो.यंत्रणा जमिनीपासून पाच फुटांवर आणि मातीवर उभारणे अपेक्षित आहे.याकारणाने काही ठिकाणी तापमानाचा पारा चढलेला दिसतो.अशा विविध कारणांमुळे या नोंदीचा वापर तापमान नोंदी लोकांपर्यत पोहोचवताना होऊ शकत नाही ,असे कांबळे यांनी नमूद केले.
सर्वसाधारण हवामान विभागाच्या स्वयंचलित यंत्रणेच्या नोंदी आणि मानवी नोंदीमध्ये एक ते दोन अंशाचा फरक असू शकतो.तरीही मानवी नोंदीपद्धत जिथे अशक्य आहेत, तिथे स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून वाढते तापमान ,पाऊसमान याची ठिकठिकाणी माहिती अधिकृत पद्धतीने हवामान विभागातर्फे लोकांपर्यत पोहोचावी.म्हणजे इतर खासगी यंत्रणांवरील अवलंबित्व कमी होऊ शकेल, अशी मागणी करण्यात येत आहे.