31 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषजया शेट्टींनी कबड्डीचीच नव्हे तर अनेक खेळांची केली सेवा!

जया शेट्टींनी कबड्डीचीच नव्हे तर अनेक खेळांची केली सेवा!

'जयोगाथा' पुस्तकाच्या प्रकाशनाप्रसंगी दिग्गजांचे उद्गार

Google News Follow

Related

एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि पुत्र अशा तिघांचाही शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मान, जन्माने-भाषेने तुळू असले तरी मराठीत लिहिलेली स्फूर्तीदायक “जयोगाथा” आणि झपाटलेल्या समाजसेवी आणि क्रीडासेवी वृत्तीमुळे जया शेट्टी हे केवळ कबड्डीचेच नव्हे तर अनेक खेळांचे खरेखुरे सेवक असल्याचे गौरवोद्गार क्रीडा क्षेत्रातील सर्वच दिग्गजांनी काढले. शेट्टी यांच्या अफाट कर्तृत्वाला आणि सक्षम नेतृत्वाला सलाम ठोकण्यासाठी “जयोगाथा” या आत्मचरित्ररुपी कबड्डी ग्रंथाच्या निमित्ताने अवघं क्रीडा विश्व कुर्ल्याच्या बंटर भवनात अवतरलं होतं.

कोरोना काळात सारेच घरात अडकले असताना घरात बसून कंटाळलेल्या जया शेट्टींनी विरंगुळा म्हणून आपल्या कबड्डी प्रेमाचे, कबड्डी संघर्षाचे आणि कबड्डी सेवेच्या आठवणींना कागदावर उतरवायला सुरुवात केली आणि त्यांनी वेचलेल्या असंख्य आठवणींना तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ज्येष्ठ क्रीडा समीक्षक रणजीत दळवी यांच्या शब्द सामर्थ्याने झपाटलेले समाजसेवी क्रीडापटू जया शेट्टी यांची “जयोगाथा” ही आत्मकथा साकारली गेली.

 

“जयोगाथा” कबड्डी ग्रंथाच्या प्रकाशनासाठी ऑलिम्पियन हॉकीपटू एम.एम. सोमय्या, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू सदानंद शेट्ये, जागतिक बंट्स संघाचे अध्यक्ष आईकला हरीश शेट्टी, एमसीएचे माजी संयुक्त सचिव डॉ. पी.व्ही. शेट्टी, विद्यमान संयुक्त सचिव अजिंक्य नाईक, बॉक्सिंग महासंघाचे माजी सरचिटणीस जय कवळी, मुंबई बंट्स संघाचे अध्यक्ष प्रवीण भोजा शेट्टी, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर, माजी भारत श्री विजू पेणकर, मल्लखांबाचे सर्वेसर्वा उदय देशपांडे, क्रिकेट संघटक श्रीपाद हळबे आणि सह्याद्री क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळंज असे क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज क्रीडापटू आणि संघटक उपस्थित होते.

हे ही वाचा:

राम मंदिर उद्घाटनापूर्वी आयएसआयएस संबंधित दहशतवाद्याला उत्तर प्रदेशातून अटक!

पवारांच्या नैराश्याचे कारण जाणून घ्या…

थंडी वाजल्यामुळे पठ्ठ्याने थेट ट्रेनमध्येच शेकोटी पेटवली!

पंतप्रधान मोदींनी शेअर केला लतादीदींचा शेवटचा श्लोक

जया शेट्टी यांनी आपली सेवा कबड्डीपुरती मर्यादित ठेवली नाही. ते कबड्डीपाठोपाठ कॅरम, क्रिकेट, फुटबॉल संघटना आणि संस्थांमध्येही सक्रिय राहिले. तसेच त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सेवेत असताना शेकडो महिला- पुरुष खेळाडूंना बँकेत नोकरी मिळवून दिली. त्यांच्याच पुढाकाराने- पाठपुराव्याने बँक स्पोर्ट्स मंडळाची राष्ट्रीय पातळीवर संघ म्हणून नोंद झाली. परिणामत: कबड्डीपटूंसाठी नोकरीची एक भन्नाट संधी उपलब्ध झाली. “जयोगाथा” पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने विविध खेळातील सर्वच खेळाडूंनी-संघटकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत “शेट्टीमहिमा”चे अभिमानाने कथन केले.

 

जया शेट्टी यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात समतोल राखताना बँकेत मराठी खेळाडूंना संधी मिळवून दिली तर बंट्स समाजातील तरूणांना उदरनिर्वाहाचे साधन देत आपला सामाजिक समतोल राखला. तसेच संसारातही तोच समतोल दाखवताना छाया बांदोडकर या मराठी मुलीशी विवाह करत शेट्टींनी संतुलनाची अनोखी गोष्ट दाखवून दिल्याचे जागतिक बंट्स संघाचे अध्यक्ष आईकला हरीश शेट्टी यांनी सांगितले. ऑलिम्पियन एम.एम. सोमय्या यांनीही जया शेट्टी यांच्या समाजसेवी आणि क्रीडाप्रेमी वृत्तीचा गौरव केला. शेट्टी हे खेळाला वाहिलेले एक दुर्मिळ कुटुंब असल्याचे सोमय्या यांनी अभिमानाने सांगितले. शेट्टी यांच्या जयोगाथासाठी क्रीडा क्षेत्रातील २५ पेक्षा अधिक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आवर्जून उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा